top of page

सरपंच मंगेश साबळे यांचे आंदोलन मागे

आठ दिवसात मागण्यांंची अंमलबजावणीचे अश्वासन, मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज आंदोलनाच्या आठव्या दिवसी लिंबू पाणी घेवून सोडले उपोषण

ree

छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टी व ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहिर करा, शेतकर्‍यांना नुकसान भरवाई द्या, या प्रमुख मागण्यांसाठी मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर आज दुपारी 3:30 वाजता सरपंच मंगेश साबळे यांनी सोडले. मंत्री अतुल सावे यांनी अश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.


सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सुरू मागील आठ दिवसांपासून साबळे यांचे उपोषण सुरू होते. दरम्यान, मंत्री सावे यांनी आज उपोषणस्थळी साबळे यांची भेट घेतली. केंद्र व राज्य शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी करणार आहे. तुमच्या मागण्या शासनाला पाठवून आठ दिवसात प्रश्न मार्गी लावू. असे आश्वासन मंत्री सावे यांनी शासनातर्फे दिल्याने मंगेश साबळे याना दिले. शासनातर्फे देण्यात आलेल्या अश्वासनावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेत असल्याचे आंदोलनकर्ते साबळे यांनी यावेळी जाहिर केले.


यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश पाटील बनकर, जिल्हा सरचिटणीस ज्ञाणेश्वर मोठे, अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष इंद्रिस मुलतानी, जिल्हा सचिव कमलेश कटारीया, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील मिरकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील, मनोज मोरेल्लू, विष्णू काटकर, भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे सचिव सैय्यद अनिस, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे आदी पदाधिकारी कार्यकर्ते, अधिकारी उपस्थित होते.


उपोषणस्थळी सोमवारी दुपारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे, आमदार रोहित पवार यांनी भेट देत मंगेश साबळे यांची विचापूस केली. हा लढा तुमचा एकट्याचा नसून सर्व शेतकरी बांधवांचा आहे. शरद पवारांनी 12 ऑक्टोबरपर्यंत शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर सर्व शेतकरी रस्त्यावर उतरतील. तुम्ही जीव धोक्यात घालू नका असे सांगितले. हे सरकार शेतकर्‍यांची फसवणूक करणारे आहे. निवडणुकीपूर्वी हेक्टरी 26 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे अश्वासन देऊन सत्तेत आल्यानंतर फक्त 13 हजार रुपये दिले गेले. हे भूलथापा देणारे सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली होती.

Comments


bottom of page