सर्पराज्ञी वृक्षोत्सवात वटपौर्णिमेचे औचित्य साधून फायकस वनाची निर्मितीअतिदुर्मिळ कृष्णवड,बोधीवृक्ष, रामवडासह 28 प्रजातीच्या वडांची लागवड
- Navnath Yewale
- 6 days ago
- 1 min read

सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र तागडगाव येथे सर्पराज्ञीचे मार्गदर्शक आदरणीय क्षितिज हिर्लेकर यांच्या संकल्पनेतून दहा जून रोजी वटपौर्णिमेनिमित्त सर्पराज्ञी वृक्षोत्सव २०२५चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात डॉ.अर्चनाताई देशपांडे व डॉ.गणेश देशपांडे या निसर्गप्रेमी दापत्यांच्या हस्ते सर्पराज्ञीत फायकस वनाची लागवड करण्यात आली. या वनांमध्ये अतिदुर्मिळ असलेल्या कृष्णवड ,बोधीवृक्ष, रामवडासह इतर 25 प्रजातींच्या वड्यांची लागवड करण्यात आली.
पर्यावरण संतुलन भारतीय संस्कृतीमध्ये वडांच्या प्रजातीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राने सर्पराज्ञी वृक्षोस्तवामध्ये सर्पराज्ञीचे मार्गदर्शक आदरणीय क्षितिज हीर्लेकर यांच्या संकल्पनेतून वटपौर्णिमेचे औचित्य साधून फायकस वनाची निर्मिती निसर्गप्रेमी डॉ.अर्चना देशपांडे व डॉ. गणेश देशपांडे यांनी विधिवत वटवृक्षांची पूजा करून केली. या फायकस वनांमध्ये निसर्गामध्ये अतिदुर्मिळ असलेले कृष्णवड ,बोधीवृक्ष रामवड या वृक्षासह पिपरी, उंबर, प्लक्ष, निंद्रूक, केळवड, दातीर, खडक पायर आदी 28 विविध प्रजातींच्या वडाची लागवड करण्यात आली.
अति दुर्मिळ असलेल्या कृष्णवड व वड, बोधीवृक्ष व पिंपळ यांच्यातील सविस्तर फरक व माहिती कु. सर्पराज्ञी सोनवणे हिने उपस्थित निसर्गप्रेमींना दिली. कार्यक्रमास सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे,सृष्टी सोनवणे, मल्हारी खेडकर, उगलमुगले सर, खाजा शेख, सोनल थोरात, दैवशाला वाकडे, दीक्षा वाकडे आदि निसर्गप्रेमी उपस्थित होते.
Comentários