इराणच्या एका निर्णयाने निम्या जगाची कोंडी? मोठा डाव टाकला, केवळ एकाच देशाला फायदा
- Navnath Yewale
- 8h
- 2 min read

इराण आणि इस्त्रायलमधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. या युद्धाने आता भीषण वळण घेतले आहे. यां संघर्षाचे पडसाद जागतिक इंधन पुरवठ्यावर उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणला आपली ताकद काय आणि कच्चे दुवे काय याची जाणीव आहे. ज्यावेळी युद्ध भीषण होत चाललं आहे, त्यावेळी इराणने आपलाव हुकमाचा एक्का खेळला आहे. इराणने ‘ होर्मुज सामुद्रधुनी’ बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. इराणच्या एका निर्णयामुळे भारतासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. इराणने या मार्गावरून केवळ चिनी जहाजांना वाहतुकीची परवानगी दिली आहे. इतर देशांची जहाजं या मार्गातून गेली तर त्यांच्यावर थेट हल्ला केला जाईल अशी धमकीच इराणने दिली आहे.
इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने स्पष्ट केले आहे की, पश्चिम देश आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या जहाजांना या मार्गावरून प्रवेश दिला जाणार नाही. ‘होर्मुज सामुद्रधुनी’ जलवाहतूकीच्या दृष्टीने महत्वाची आहे. जगभरातील जहाजं याच मार्गातून जातात. या मार्गावर इराणचा ताबा आहे. रणनितीच्या दृष्टीने इराणची ही जमेची बाजू आहे. याच मार्गाने भारत आपल्या कच्च्या तेलाची मोठी आयात करतो. जर हा मार्ग फक्त चिनसाठी खुला असेल याचा अर्थ भारतासाठी तो बंद असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. त्याचा थेट फटका भारताला बसण्याची दाट शक्यता आह. इराणच्या या एका निर्णयामुळे भारतात इंधन टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणाला गींभीर्याने घेतले आहे. अमेरिकन सैन्य या सागरी मार्गाला संरक्षण देतील असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. कोणत्या ही स्थितीत जागतिक इंधन पुरवठा आम्ही खंडीत होऊ देणार नाही, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. या भूमिकेमुळे पर्शियन आखातात तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. इराणने जाहीर केले आहे की, या मार्गावरून फक्त चिनी जहाजेच जाऊ शकतील. इतर कोणत्याही देशाचे जहाज दिसल्यास त्यावर थेट हल्ला केला जाईल.
इराणच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारताला बसण्याची शक्यता आहे, कारण भारताच्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होते.
इराणच्या या धमकी नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कडाडले आहेत. “ आम्ही इंधन पुरवठा थांबू देणार नाही आणि आमच्या सैनिकांच्या मदतीने या मार्गाला संरक्षण देऊ” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आता या सागरीमार्गावर इराण आणि अमरिकेचे सैन्य समोरासमोर येण्याची चिन्हं दिसत आहेत. इराणने केवळ चिनच्या जहाजांना सुरक्षित प्रवासाची हमी दिली आहे. भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे कारण आपली उर्जा सुरक्षा या सागरी मार्गावर अवलंबून आहे. जर ही वाहतूक दीर्घकाळ ठप्प राहिली, तर भारतात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. अमेरिकेने इराणच्या या भूमिकेला कडाडून विरोध केला आहे. या युद्धामुळे निर्माण झालेली ही कोंडी सोडवण्यासाठी आता जागतिक स्तरावर कोणत्या हालचाली होतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.



Comments