top of page

दुबईत आडकलेल्या महराष्ट्रातील लोकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारची तयारी पण...- मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: मध्य पूर्वेत भीषण युद्ध सुरू आहे. इराणकडून केवळ इस्त्रायल आणि अमेरिकेच्या तळावर नाही तर आखाती देशांमध्ये मिसाइल हल्ले सुरू आहेत. सौदी अरेबिया, ओमान, दुबई, कुवैत या ठिकाणी मागच्या काही दिवसात इराणने हल्ले केले आहेत. आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय रहतात. यात महाराष्ट्रीयन लोकही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना मायदेशात आणण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत, या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आम्ही व्हाट्सअ‍ॅप नंबर दिलेला आहे. लोक त्यावर संपर्क साधत आहेत. त्यांच्या काही अडचणी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “ त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न सुरू केले आहेत. मूळामध्ये आपल्याला माहिती आहे की एअर इंडियाची विमानं हळूहळू त्या ठिकाणी जाऊन लोकांना परत आणत आहेत. काही एअर स्पेसेस बंद आहेत, काही सुरू आहेत. जिथून आणणं शक्य आहे, तिथून आपण लोकांना आणत आहोत.” कुवैतमध्ये समस्या आलेली, काही ट्रान्झिट पैसेंजर आहेत. त्यांच्या व्हिसाच्या अडचणी होत्या. एम्बीसने प्रयत्न करून त्यांना एका ठिकाणी थांबवलेलं आहे. त्यांना अडचण येणार नाही असा प्रयत्न आपल्यावतीने करण्यात आला आहे.

“ परदेशात जिथे-जिथे आपली मराठी मंडळं आहेत, ती सक्रीय करण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून आपले जे लोक आहेत, त्यांना मदत करत आहोत. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून गिरीश महाजन त्यांची बोलले आहेत. आपले चिफ प्रोटोकॉल अधिकारी गावंडे यांना ही जबाबदारी दिली आहे. कारण ते फॉरेन सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी एंबसीची बैठक घेतली आहे. ज्या एसओपी आहेत, त्या नागरिकांना दिल्या आहेत. लोकांनी काय काय करायचं आणि काय करू नये हे पोहचवलं असल्याचंही देवेद्र फडणवीय म्हणाले.


मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, “ राज्य सरकारने केंद्र सरकाशीर चर्चा करून ही भूमिका मांडली होती की जे काही महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांना परत आणण्यासाठी व्यवस्था करु इच्छितो. परंतु केंद्राने सांगितलं की, सगळ्या राज्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली, तर गोंधळ होईल. एअरस्पेस सुरक्षित नाहीत. असुरक्षित एअरस्पेस मध्ये एखादं विमान गेलं तर काय होऊ शकते हे आपण समजू शकतो. केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. आम्हाला लोकांचे मेसेजेस येत आहेत. आम्ही एमइए ला कळवतो असं मुख्यमंत्री फडणवीस योवळी म्हणाले.

Comments


bottom of page