top of page

पुण्यातील लोहगावात पोलिसांचा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज; विद्यार्थी जखमी

पुणे: पुण्याच्या लोहगाव येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वसतिगृहात मंगळवारीरात्री होळी साजरी करणार्‍या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून कॅम्पसमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलाजीच्या वसतिगृहात विद्यार्थी धुलिवंदन साजरा करत होते. रात्रीच्या वेळी अचानक पोलिस कर्मचारी वसतिगृहात घुसले आणि त्यांनी सेलबे्रेशन थांबवण्याचे आदेश दिले. कॅम्पसमध्ये काही बेकायदेशीर हालचाली किंवा निषेध सभा होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र पोलिसांनी अचानक येऊन लाठ्या फिरवण्यास सुरुवात केली. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली होती. एका विद्यार्थ्याने पोलिसांना कारवाईचे कारण विचारले असता, धक्काबुक्की करून लाठीने मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर शांततेत सण साजरा करत असतानाही पोलिसांनी अटकेची धमकी दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या कारवईमुळे परराज्यातून पुण्यात शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणाबाबत लोहगाव पोलिस चौकशी करत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर बाबी तपासून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे पालिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments


bottom of page