top of page

सोलापुरात सकल मराठा समाजाच्या बैठकीत राडा!


संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. गायकवाड यांच्यावरील हल्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमठत आहेत. मराठा समाजाची पुढील भुमिका ठरविण्यासाठी सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतिने मंगळवारी (15 जूलै) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बैठक सुरू होताच समाजातील कार्यकर्ते एकमेकांध्ये भिडले आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.


सोलापुर येथे आयोजित करण्यात आलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठक सुरू होती. दरम्यान बैठक सुरु होताच पंढरपूर येथील पेशाने वकील असलेल्या रोहित फावडे यांच्या भाषणाला सुरुवात होताच एका गटाने त्यास रोखण्याचा प्रयत्न केला. यातच दोन गट भिडल्याने याचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान जन्मजयराजे भोसले यांच्या विषयी चुकीची माहिती देत असल्या कारणाने जन्मजयराजे भोसले यांच्या समर्थकांनी अ‍ॅड. फावडे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा वाद उफळला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाल्याचे समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले म्हणाले.


सकल मराठा समाज, क्रांती मोर्चा, मराठा सेव संघ आयोजीत बैठकीमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुढील दिशा ठरविण्यासाठी शासकिय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सुरुवात होता अ‍ॅड रोहित फावडे मार्गदर्शन करताना तत्पूर्वी त्यांनी स्व.परिचय दिला आणि जन्मेजयराजे भोसले यांचा मुलगा आरोपी सोबत पोलिस ठाण्यात कशासाठी गेला होता? असा प्रतिप्रश्न उपस्थित करताच उपस्थित जन्मेजयराजे भोसले यांच्या समर्थकांनी अ‍ॅड. फावडे यांना रोखले. मात्र, काहींनी श्री फावडे यांना बोलण्याचे सुचवले असता दोन गट आपसात भिडले आणि एकच गोंधळ उडाला.


दरम्यान, जन्मेजयराजे भोसले यांच्या मुलाने म्हणजेच अमोलराजेंनी दीपक काटे याच्या कानात काहीतरी सांगितल्याचा आरोपही अ‍ॅड. फावडे यांनी केला. मात्र तो चुकीचा असून माझा मुलगा अमोलराजेे दीपक काटे याला सज्जड दम दिल्याचे जन्मेजयराजे भोसले म्हणाले.


बैठकीमध्ये अ‍ॅड. रोहित फावडे यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणार्‍या दीपक काटे याच्या कानात अमोलराजे भोसले काय म्हणाले? असा आरोप केला दरम्यान, याच एकेरी उल्लेख आणि आरोपानंतर जन्मजेयराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले. आक्रमक समर्थक अ‍ॅड. रोहित फावडे यांच्या अंगावर धावून गेले, प्रचंड मारहाणीमुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. उपस्थित समन्वयकांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काही वेळात घटनास्थळावर पोलिस दाखल झाले. अ‍ॅड. रोहित फावडे याला पोलिसांनी आध बाहेर काढले त्यानंतर बैठक पून्हा पर्ववत सुरू करण्यात आली.

Comments


bottom of page