top of page

सोशल माध्यमांवरचा अजय म्हस्के निघाला राजू शेख बीडमधील दोन मुलांच्या बापाचा ‘हिंदू’ बनून युवतीवर अत्याचार; ‘लव जिहाद’ चा हिंदू संघटनांचा आरोप

बीड: बीडमधील राजू सिकंदर शेख याने सोशल माध्यमावर हिंदू ‘अजय म्हस्के’ नावनं खातं सुरू केलं. सोशल माध्यमांवरील याच खात्याद्वारे पालघरमधील हिंदू युवतीशी मैत्री, पुढे प्रेमसंबंध अन् लग्नाचं अमिष दाखवत, तिचा शारीरिक अन् आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


हिंदू संघटनांनी या प्रकाराला ‘ लव जिहाद’ असल्याचा अरापे करत, आरोपीविरोधात कठोरातली कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पालघर पोलिसांनी राजू सिकंदर शेख उर्फ अजय म्हस्के याला अटक केली असून त्याला न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, पीडितेचं आर्थिक शोषण करण्यात राजू शेख याची पत्नीचा देखील सहभाग असल्याचं समोर आलं आहे.


पीडित युवतीचे पतीबरोबर सतत वाद होत असल्याने ती तिच्या मुलाला घेऊन वडिलांबरोबर राहते. पीडित युवतीचे देखील सोशल माध्यमांवर खाते आहे. याच माध्यमावर अजय म्हस्के नावाच्या खात्यावरुन पीडित युवतीला मैत्रीची रिक्वेस्ट आली अन् तिने ती एक्सेप्ट केली.


यानंतर पीडिता आणि राजू सिकंदर शेख उर्फ अजय म्हस्के याच्याशी सोशल माध्यमावर मैत्री झाली. पुढे राजू शेख याने तिला त्याचा मोबाईल क्रमांक दिला. मोबाईलवर वारंवार बोलणे झाल्यानंतर प्रत्यक्ष भेटले. भेटीनंतर राजू सिकंदर शेख उर्फ अजय म्हस्के याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला.


लग्न करत असल्याने मैत्रीची खात्री पटली, पुढे हॉटेल, लॉज भेटीत शारीरिक संबंध ठेवले. लग्न करायचे म्हटल्यावर आधारकार्ड पाहिल्यावर, त्यावर राजू सिकंदर शेख हे नाव पीडितेला आढळलं. यानंतर अजय म्हस्केंच मूळ नाव हे राजू सिकंदर शेख आहे हे पीडितेला कळालं.


दरम्यान राजू सिकंदर शेख हा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याती बहेगावचा रहिवाशी असल्याचं त्या आधारकार्डया पत्यावरुन कळालं. राजू सिकंदर शेख याने जून 2026 मध्ये लग्न करू, असे पीडितेला सांगितले. बीडमध्ये पीडितेने राजू सिकंदर शेख याची भेट घेतली. तेथून पुढे तो अहिल्यानगर इथं गेला. त्यानंतर त्याने पीडितेची दोन वेळा हॉटेलात भेट घेतली. त्याने पुन्हा पीडितेला लग्नाचं अमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले. पण पुढे पीडितेने राजू सिकंदर शेख याची अधिक चौकशी केल्यावर त्याचे लग्न झालेले असून, त्याला दोन मुलं देखील आहेत. अशी महिती समोर येताच तिला धक्का बसला.


आरोपीच्या पत्नीकडून आर्थिक शोषण : पीडितेने याचा जाब विचारल्यावर, राजू सिकंदर शेख याने त्याच्या बीडमधील पत्नीला समोर केलं. तिने तिचे पीडितेचे अश्लील फोटो- व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच दोन लाख रुपयांची मागणी केली. यापूर्वी देखील पीडितेकडून अडीच लाख रुपये उकळले. यानंतर पीडितेने पुढे पोलिसांकडे जात झालेल्या अन्यायाची कॅफियत मांडत तक्रार दाखल केली.


पीडितेच्या तक्रारीवरून पालघर पोलिसांनी सापळा रचून राजू सिकंदर शेख याला पुण्यातून अटक केली आहे. पोलिसांनी राजू शेख यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात फसवणूक, ब्लॅकमेल आणि खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यता आले आहेत. दरम्यान, बजरंगदलाचे पालघरमधील पदाधिकारी मुकेशद दुबे आक्रमक झाले असून, याप्रकरणात कडक कायदेशीर कारवाईची त्यांनी केली आहे.

Comments


bottom of page