top of page

स्मिताताई खोत यांचे अनोखे अभिष्टचिंतन, जिल्हा परिषद शाळेला पाच संगणक संच दिले भेट


जव्हार : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पवारपाडा येथे अक्षय खोत यांच्या मातोश्री स्मिता ताई खोत यांच्या वाढदिवसानिमित्त 5 संगणक वाटप. आज दि. ५ सप्टेंबर रोजी अक्षय खोत यांच्या मातोश्री स्मिता ताई खोत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा पवार पाडा येथे 5 संगणक च वाटप करण्यात .गेल्या 5 वर्षापासुन जव्हार तालुक्यातील दुर्गम भागातील या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलांना  आधुनिक तंत्र  तंत्रज्ञानाची ओळख होणार असून डिजिटल शिक्षणाचा मार्ग खुला होणार आहे.


मुलांना संगणक ची बेसिक माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम संजय रानडे सर यांच्या मदतीने हातात घेतला आहे. शाळेतील शिक्षक व पालकांनी सांगितले की. संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक मनोरंजक आणि उपयुक्त होईल गणित विज्ञान इंग्रजी यासारखे विषय प्रत्यक्ष दाखवून समजवता येतील  जिल्हा परिषद शाळेची गरज ओळखून शैक्षणिक साहित्याची वाटप करण्यात येते.


यावेळी एकनाथ दरोडा झाप सरपंच यांनी बोलताना सांगितले की, आधुनिक युगात टिकायचे असेल तर अभ्यास बरोबर संगणक शिकणे खूप महत्त्वाचे आहे .आपली परिस्थिती बदलायची असेल तर फक्त शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही. त्यामुळे अभ्यास करून मोठे व्हा .यावेळी माजी सरपंच राजेश वातास, ग्रामपंचायत सदस्य वंदना ठोंबरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली जाधव, दयानंद गोडे, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक  शिक्षक अरुण पवार सर, ठोंबरे सर व पालकवर्ग उपस्थित होते.

Comments


bottom of page