अभिजीत दिपके यांच्या संसदेवरील मोर्चाला दिल्ली पोलिसांची परवानगी नाही!परवानी मिळो ना मिळो मोर्चा होणारच - अभिजीत दिपके; उद्धव ठाकरे उद्या दिल्लीला रवाना
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 20 जूनपासून नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलेले आहे. अशातच आता दिपके यांनी 20 जुलै रोजी संसद चलो मोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी जंतरमंतर येथे जमावे असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी अशा कोणत्याही मोर्चासाठी परवानगी मागण्यात आलेली नाही, ना ती देण्यात आली आहे, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे या मोर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. मोर्चापूर्वी दिल्ली पोलिसांनी सार्वजनिक सूचना जारी करत स्पष्ट इशारा दिला आहे की, परवानगीशिवाय मोर्चात सहभागी होणार्यांविरुद्घ कायदेशीर कारवाई केली जाईल. तसचे पाचपेक्षा जास्त लोकांनी एणत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे . त्यामुळे दिपके यांच्यासह आंदोलकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
कलम 163 लागू: दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सीजेपीच्या दिपके यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही आंदोलन, मोर्चा किंवा रॅलीसाठी परवानगी मागितलेली नाही आणि ती देण्यातही आलेली नाही. नवी दिल्ली जिल्ह्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 163 (पूर्वीचे फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 144) लागू करण्यात आले आहे. या आदेशानुसार, जंतर मंतरवरील अधिकृत आंदोलन स्थळ वगळता पूर्वपरवानगीशिवाय कोणताही मोर्चा, निदर्शने
रॅली किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींची गर्दी करण्यास सक्त मनाई आहे.
दरम्यान, पोलिसांच्या सूचनेनुसार,20 जुलैपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने नागरिकांची आणि महत्वाच्या सरकारी संस्थांच्या सुरक्षेसाठी कउक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कलम 163 चे उल्लंघन करणार्यांवर भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 223 तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवई केली जाईल. दिल्ली पोलिसांनी सर्व नागरिकांना कायद्याचा आदर करण्याचे, कोणत्याही बेकायदेशीर जमाव किंवा मोर्चात सहभागी न होण्याचे आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
परवानगी मिळो ना मिळो मोर्चा होणारच! : सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात हलवल्यानंतर अजिषय भावनिक आणि तेवढेच संतप्त झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी जंतरमंतरवर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. उद्याच्या संसदेवरील मोर्चासाठी परवानगी मिळो ना मिळो मोर्चा होणारच असा ठाम विश्वास व्यक्त करत नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
उद्धव ठाकरे उद्या दिल्लीकडे रवाना : नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक, अभिजीत दिपके यांनी नवी दिल्ली येथे जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले, या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पूर्ण पाठिंबा जाहीर केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई येथे सोनम वांगचुक यांच्यासमर्थनार्थ आंदोलन केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, संसदेवर मोर्चासाठी मी स्वत: उद्या दिल्लीला जात आहे.