आईसोबत भांडण झालं, घराबाहेर पडली अन्.. ,आमदार रोहित पवार यांच्या स्विय सहाय्यकाच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह अढळला; बारामतीत खळबळ
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत अढळल्याने बारामती शहरात खळबळ उडाली आहे. बारामतीतील रुई परिसरातील साईनगर भागात या मुलीचा मृतदेह अढळून आला. या प्रकरणानंतर बारामतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आईसोबत झालेल्या वादानंतर अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली होती. त्यानंतर काही वेळातच तिचा मृतदेह साईनगर परिसरात अढळून आल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. हा प्रकार हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पोलिस या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेनासाठी बारामती शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
माहिती मिळताच आमदार रोहित पवार देखील बारामती शासकीय रुग्णालयात पोहोचले पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, शवविच्छेदन अहवाल आणि अधिकृत महिती समोर आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने बारामती शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आई आणि मुलीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या रागातून मुलगी घरातून निघून गेली. ती परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, सकाळी तिच्या घराजवळच तिचा मृतदेह आढळफन आल्याने परिसरात खळबळ उडाली.



Comments