top of page

आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगितमंत्री गिरीश महाजन यांची आंदोलनस्थळी भेट; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठकीचे अश्वासन

पंढरपूर: शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये शुक्रवार (दि.12) पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. रोहित पवार यांच्या आदोलनाला शेतकरी संघटनांसह विविध नेत्यांनी पाठींबा दिला. विरोधी पक्षाकडून रोहित पवार यांच्या आंदोलनावर टीकाही करण्यात आली. आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी सरकारच्या वतिने मंत्री गिरिष महाजन यांनी सायंकाळी आंदोलनस्थळी रोहित पवार यांची भेट घेतली. मागण्यांसदर्भात गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन केल्यानंतर आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन सोडले.


सरकारने जाहिर केलेल्या 35 हजार कोटीच्या कर्जमाफी जीआरमध्ये सुधारणा करुन शेतकर्‍यांना विनाअट सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी रविवारी (दि.14) मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. रोहित पवार यांनी शेतकर्‍यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांच्यासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. यानंतर रोहित पवार यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं. शेतकरी कर्जमाफी संदर्भात रोहित पवार दि.22 जूनपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. शुक्रवार (दि.22 जून) पूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीच्या अटीवर उपोषण मागे घेण्यात आलं आहे.


यावेळी रोहित पवार म्हणाले की, 22 तारखेला अधिवेशन आहे. त्याव आधी गसरकार मिटींग घेणार आहे. 30 जूनपासून कर्जमाफी लागू होणार आहे. जे बदल आहे, ते 30 जून आधी होणार आहेत. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात. आपल्याकडे थोडा वेळ आहे. आपण चर्चेला मुख्यमंत्र्यांकडे गेले पाहिजे का? चर्चेला राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर, आणि ठाकरे गटाचे नेतेही असतील. शेकापचे जयंत पाटील असतील. महादेव जानकर असतील. सर्व नेते आहेत. चर्चा करू.


रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, ‘ दोन छोट्या अटी आहेत. सरकार त्या ठेवणार नाही. पण त्यात गडबड झाली तर 4 जुलै रोजी मराठवाड्यात आंदोलन करू. बैठक ठरली आहे. मागण्यासमोर आहेत. उगाच राजकारण आणून उपोषण लांबवून शेतकर्‍यांचं नुकसान करायचं नाही. रविकांत तुपकर उद्यापासून उपोषण सोडणार आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी तीन दिवस न लावता. उद्या किंवा परवाच त्यांना भेटावं, असंही रोहित पवार म्हणाले.


गिरीश महाजन रोहित पवार यांच्या भेटीवेळी म्हणाले की, ‘ राज्य सरकार सकारात्मक आहे. मोदी असतील किंवा फडणवीस असतील सर्व सकारात्मक आहेत. वारंवार शेतकर्‍यांना कर्जमाफी का द्यावी लागते. तर शेतकरी अडचणीत असतो. त्यामुळे त्यांना कर्जमाफी देत असतो. शेतकर्‍यांचा पाण्याचा प्रश्नही आपण सोडवत आहोत. रोहित पवार यांच्या मागण्याबांबत बैठक बोलावली आहे. चर्चेतून तोडगा निघेल. मी रोहित पवार यंना विनंती करतो की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं.


या चर्चेनंतर रोहित पवार यांनी आंदोलन स्थगित केले. दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनावर सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी टीका करत ‘सोन्याचा चमचा घेवून जन्मला आले, रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन म्हणजे स्टंटबाजी’ अशी टीका केली यावर बोलताना रोहीत पवार म्हणाले की, कोणी कोणत्या कुटुंबात जन्म घ्यावा हे काही हातात नसतं, पण मी ज्या कुटुंबात जन्माला आलो त्याचा मला अभिमान आहे. सोन्याचा चमच्या घेऊन जरी जन्माला आलो असलो, संवेदनशील मुद्यांवर संघर्षाची शिकवन आम्हाला संत, महामानवांच्या विचाराने दिली आहे. शेतकर्‍यांच्या संवेदन मुद्यावर संघर्ष करत असल्याचे म्हणत त्यांनी शेलक्या शब्दात विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.


आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी रोहित पवार यांच्या कुटुंबीयांनी आंदोलनस्थळी रोहित पवार यांची भेट घेतली, यावेळी रोहित पवार यांचे कुटुंबीय भाऊक झाल्याचे दिसून आले. विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांसह सायंकाळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवार यांची भेट घेवून चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर स्वपक्षासह काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विविध नेत्यांसह समाजीक कार्यकर्त्यांनी आंदोलना पाठिंबा दिला. दरम्यान, रोहित पवार यांच्या आंदोलनाला शेतकरी, सामन्य नागरिकांतून मोठा पाठिंबा मिळला. आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी आंदोलक रोहित पवार यांची प्रकृती खालवली होती. त्यामुळे पंढरपूरात आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments


bottom of page