top of page

ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्याच्या मागणीसाठी मनसेची स्वाक्षरी मोहिम शिवाजी पार्क परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे,अमित ठाकरे, उर्वशी ठाकरेंचा सहभाग

4 hours ago
2 min read

मुंबई : निवडणुक आयोगाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी (दि.12) स्वाक्षरी मोहिम राबवली. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, उर्वशी ठाकरे यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला.


वाशी रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहिम राबवली. या मोहिमेत नागरिक, महिला आणि विशेषत:तरुणांनी सहभागी होत स्वाक्षर्‍या केल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. स्वाक्षरी मोहिमेदरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात निषेध नोंदवला.


मनसेचे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम आयोजित करण्यता आली होती. ‘वन टू थ्री फोर .. ज्ञानेश कुमार वोट चोर, ज्ञानेश कुमार यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय आणि गद्दार ज्ञानेश, राजीनामा द्या अशा घोषणांनी वाशी रेल्वे स्थानक परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांनी तिरंगा ध्वज फडकावत ‘ इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय ’ अशा घोषणा दिल्या. गद्दार ज्ञानेश राजीनामा द्या, असा मजकूर असलेले टी-शर्ट परिधान करून कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते.


निवडणुक आयोगाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करत मनसेने या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. निवडणुक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि आयोगाच्या उत्तरदायित्वाबाबत पक्षाने आक्षेप नोंदवले. देशभरात तरुणांकडून निवडणूक अयोगाच्या कारभाराविरोधात आंदोलने होत असल्याचा दावा मनसेने केला. मुंबईत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आंदोलन केल्यानंतर नवी मुंबईतही स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला.


स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेल्या काही नागरिकांनी केंद्र सरकार आणि मुख्य निवडणुक आयुक्तांच्या भुमिकेबाबत नाराजी व्यक्त केल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. स्वाक्षरी करून निषेध नोंदविण्याबरोबरच या मोहिमेतून निवडणूक प्रक्रियेविषयी नागरिकांच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पक्षाच्या पदाकिधार्‍यांनी नमूद केले.


दरम्यान, नवी मुंबईपुरती ही मोहिम मर्यादेत न ठेवता शहरातील प्रत्येक विभागात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येणार आहे. नागरिकांपर्यंत पोहोचून निवडणुक आयोगाच्या कारभाराविरोधातील भूमिकरा मांडली जाईल आणि आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे गजानन काळे यावेळी म्हणाले. या मोहिमेत मनसेचे पदाधिकारी महिला सेना, विद्यार्थी सेना, वाहतूक सेना आणि विविध अंगिकृत संघटनांचे प्रतिनिधी सभागी झाले होते. शहरातील विविध भागांत मोहिम राबवून नागरिकांचा प्रतिसाद जाणून घेण्याची पक्षाची भूमिका असल्याचंही सांगण्यात आलं. यावेळी मनसेचे उपशहराध्यक्ष निलेश बाणखेले, शहर सचिव सचिन कदम, शहर सहसचिव व नगरसेवक अभिजित देसाई, महिला सेना शहराध्यक्षा डॉ. आरती धुमाळ, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष संदेश डोंगरे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

Comments


bottom of page