top of page

अमोल खुणेंवर हल्ला; 50 ते 100 हल्लेखोरांकडून मारहाणीचा आरोप बीडच्या रुग्णालयात उपाचर सुरू; खुणेंचे जरांगे पाटलांवर गंभीर आरोप

5 hours ago
2 min read

बीड: जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी, पण आलीकडच्या काळात जरांगे पाटील व त्यांच्या सहकार्‍यांवर आरोप करत जरांगे पाटलांना उघड आव्हान देणार्‍या अमोल खुणेंवर रविवारी (दि.11) प्राणघातक हल्ल्याची घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील पाली शिवारामध्ये एका मंदीरात दर्शन घेतल्यानंतर 50 ते 100 हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा आरोप अमोल खुणेे यांनी केला आहे. जरांगे पाटील यांनीच सुपारी देवून हल्ला घडवून आणल्याचा आरोप अमोल खुणे यांनी केला आहे.


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकार्‍यांवर गंभीर आरोप करत

त्यांच्या विरोधात यंत्रणांकडे अमोल खुणे यांनी तक्रारी केल्या. आलिकडच्या काळात अमोल खुणे जरांगे पाटीलांसह त्यांच्या सहकार्‍यांवर थेट अश्लिल भाषेत टिका करताना दिसून येत आहेत. जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना आव्हान देणारे अमोल खुणे यांनी सोशल मीडियावर प्रसंगी माध्यमांसमोर जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. मागील वर्षी जरांगे पाटील यांचे कथित घातपात, सुपारी प्रकरणी अमोल खुणे यांच्यासह इतर दोघांना कारागृहात जावे लागले होते.


त्यानंतर अमोल खुणे जामिनावर बाहेर आल्या पासून त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोपांची राळ उठवली आहे. कालच जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन श्री क्षेत्र नारायणगड येथे आयोजित दसरा मेळाव्या बाबत गोंधळा घालण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता. जरांगे पाटील म्हणाले की, दसरा मेळाव्यात आमचेच लोकं आमच्या आंगावर घालून गोंधळ घालण्याचं षडयंत्र रचले जात आहे. मराठ्यांना बदनाम करून जवळच्या लोकांना त्रास देवून मला एकटं पाडण्याचा डाव आखला जात असल्याचंही जरांगे पाटील म्हणले होते.


अमोल खुणे सहकार्‍यांसमवेत रविवारी (दि.11) बीड पासून जवळच असलेल्या पाली शिवारातील नागनाथ मंदीरात दर्शनासाठी गेले होते. याचवेळी तुळजापूर येथून ज्योत आणण्यासाठी गेलेले 50 ते 100 जण तिथे आले. अमोल खुणे यांना पाहताच त्यांनी लाकडी दांडक्याने आमोल खुने यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात अमोल खुणे यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर जखमी अवस्थेत उपचार सुरू आहेत.


जरांगे पाटील यांनीच माझ्यावर हल्ल्याची सुपारी दिली: मनोज जरांगे पाटील यांनीच माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप खुणे यांनी केला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी आता पोलीस करतील. नारायणगडावर दसरा मेळावा होत असून या मेळाव्याला मी येणार असल्याचं जाहीर केलं होतं. मी त्या ठिकाणी येऊ नये म्हणूनच हा हल्ला माझ्यावर करण्यात आल्याचा आरोप देखील खुणे यांनी केला. दरम्यान आता या प्रकरणात बीड ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Comments


bottom of page