top of page

अभिजीत दिपकेंसह अशुतोष रांका, सौरव दास यांची सुटका; जंतरमंतरवर आंदोलन तीव्र होणार!

16 hours ago
1 min read

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह सहसंयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका या तिघांची सुटका करण्यात आली आहे. या तिघांना कार्यकारी दंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी या तिघांना सकाळी विशेष कार्यकारी दंडाधिकार्‍यांसमोर हजर केलं होतं. यावेळी या तिघांची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले. काल (दि.10) सकाळी मुंबईहून दिल्लीला पोहोचल्यानंतर विमानातूनच दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके, सौरव दास, अशुतोष रांका यांना ताब्यात घेतलं होतं.


पोलिसांनी ताब्या घेतल्यानंतर 12 तास उलटूनही तिघांच्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप सीजेपीने केला होता. तसेच त्यांच्या वकिलांनाही माहिती देण्यास नकार दिल्याचे सीजेपीचे म्हणणे होते.


दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे यांनी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहून अभितीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या स्थितीबाबत माहिती मागितली होती. तिघांना नेमके कुठे ठेवण्यात आले आहे, त्यांना एकत्र ठेवले आहे की वेगवेगळ्या ठिकाणी, तसेच कोणत्या यंत्रणेने त्यांना ताब्यात घेतले आहे, असे प्रश्नही सीजेपीने उपस्थित केले होते. अशातच आता दिल्ली पोलिसांनी तिघांना कार्यकारी दंडाधिकार्‍यांसमोर हजर केल्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकार्‍यांकडून या तिघांची सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे आता सीजेपीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाची धार आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments


bottom of page