आंदोलकांना हात लावाल तर महाराष्ट्र बंद पाडू, सीजेपीच्या आंदोलनातून आदित्य ठाकरेंची गर्जना तिन्ही ठाकरेंचा रूद्रावतार; आदित्य, अमित ठाकरे पोलिस व्हॅनच्या टपावर चढले

मुंबई: मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीसह डाव्या संघटनांचे आंदोलन पेटले असतानाच आज मुंबईतही सरकारविरोधी आंदोलनाचा भडका उडाला. मुंबईच्या शिवाजीपार्क परिसरात आंदोलनाची हाक दिल्याने आज सकाळपासूनच या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, दुपारी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे आंदोलनाता उतरल्याने आंदोलकांना उत्साह आला आणि आंदोलन चांगलेच भडकले.
मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काल दिल्लीत सीजेपीचे आंदोलन रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व हातखंडे अवलंबीले.सीजेपी आंदोलनाच्या समर्थनार्थ आज मुंबईत शिवाजीपार्क परिसरात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. सकाळपासून शिवाजीपार्क परिसरात गोळा होणार्या आंदोलकांना पोलिस गाडीत कोंबून ताब्यात घेत होते. दुपारी शिवसेना भवन परिसरातून काही आंदोलकांना गाडीत घेवून जात असताना तिन्ही ठकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अचानक पोलिसांच्या गाडीला घेराव घातला आणि ही गाडी रोखून धरली. गाडीत कोंबलेल्या आंदोलकांना सोडण्यासाठी तिन्ही ठाकरे अडून बसले. अदित्य ठाकरे यांनी तर पोलिसांच्या गाडीवर चढून घोषणा दिल्या. तर अमित ठकारे आणि तेजस ठाकरे हेदेखील समोरच्या गर्दीत ठाण मांडून होते.
सीजेपीच्या या आंदोलनात ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्याने अत्यंत साधे वाटणारे हे आंदोलन अचानक भडकले. यावेळी आदित्य ठाकरे हे अत्यंत आक्रमक दिसत होते. त्यांनी मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. आता हे आंदेालन शांत होणार नाही. आता हे आंदेालन चिघळणार, सगळ्यांनी शिवाजी पार्कच्या दिशेने या. आम्ही आता इथून रात्र झाली तरी हलणार नाही. आम्ही सर्व विभागप्रमुखांना बोलावले आहे. मुंबई पोलीस हे आज दिल्ली पोलिसांसारखे वागले, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी सकाळपासून सीजेपीच्या या आंदोलनात अग्रणी असणारे संदीप देशपांडे आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे अमित ठाकरे यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्याबाहेर जाऊन ठिय्या मांडला. अमित ठाकरे यांच्या पाठोपाठ आदित्य आणि तेजस ठाकरे देखील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यामुळे पोलिस ठाण्यात तिन्ही ठकारेेंचा ठिय्या सुरू झाला. दरम्यान, तिन्ही ठाकरंनीे शिवाजी पार्क परिसरात ठिय्या मांडल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावून आंदोलन होणार याची पुरेपूर काळजी घेतलेली होती. तगडा पोलिस बंदोबस्त आणि मोठ्या पिंजारा गाड्या पार्क करून आंदोलकांना एकप्रकारे कायदेशीर बडग्याचा सूचक इशाराच पोलिस यंत्रणेकडून देण्यात आला होता. त्यातच शिवाजी पार्क परिसरात गोळा होणार्या आंदोलकांची धरपकड करण्यात येत होती. काही आंदोलकांना पोलिसांनी कालच्या दिल्लीतील आंदोलकांप्रमाणे फरपटत गाडीपर्यंत नेले जात होते. अमित ठाकरे यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आणि तिन्ही ठाकरे बंधुंची आंदोलनात एंन्ट्री झाली. तिन्ही ठाकरेंच्या अचानक एन्ट्रीमुळे सीजेपीचे आंदोलन चांगलेच भडकले.
आंदोलनामध्ये तिन्ही ठाकरेंची एन्ट्री झाल्याने सीजेपी आंदोलकांचा उत्साह वाढला. सीजेपी आंदोलकांकडून यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामध्ये मनसेसह शिवसेना ठाकरे गटाचे नेतेही सहभागी झाल्याने शिवाजीपार्क परिसरास दिल्लीच्या जंतरमंतरचे स्वरुप प्राप्त झाले होते.



Comments