तुकराम मुंढे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट उपमुख्यमंत्र्यांकडून विशेष सूचना, महिलासाठीचे सौंदर्यप्रसाधने तुकाराम मुंढेच्या रडारवर
- Navnath Yewale
- Aug 7
- 1 min read

मुंबई : आयएएस तुकाराम मुंढे हे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत. त्यांनी अन्नभेसळ आणि बनावट औषधांविरोधात जोरदार राबवली आहे. त्यामुळं जनमाणसातून त्यांच्या कार्याचं कौतुक होत आहे. जनतेच्या कौतुकास पात्र ठरलेल्या या तुकाराम मुंढे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. याभेटीदरम्यान मुंढे यांच्या कार्याची तपसंच इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
सुनेत्रा पवार यांनी स्वत: आपल्या सोशल मीडियातून तुकाराम मुंढेच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसंच त्यांच्या कार्याचा गौरवही केला आहे. यावेळी मुंढे हे प्रसन्न मुद्रेनं उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना दिसत आहेत. सुनेत्रा पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “ श्री. तुकाराम मुंढे यांनी सदिच्छा भेट घेत विविध विषयांवर तसंच सुरू असलेल्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी सौंदर्यप्रसाधनं तसंच ग्राहक वस्तूंच्या विक्री करणार्या आस्थापनांमध्ये कालबाह्य उत्पादनं विक्रीस ठेवली जात नसल्याची खात्री करण्यासाठी प्रभावी तपासणी मोहीम राबवणं व आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचना त्यांना केल्या. नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन या विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ हे आहेत. झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख या नात्यानं तुकाराम मुंढे यांनी आपल्या कामाचा आढावा सुनेता पवार यांना सांगितला. यावेळी महिलसांठी वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधनं ज्यामध्ये देखील औषधांच वापर केला जातो, त्यातील गैरप्रकारावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना पवार यांनी मुंढे यांना दिल्या आहेत. त्यामुळं यापुढच्या काळात आता कॉस्मेटिक इंडस्ट्री ही तुकाराम मुंढे यांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. शिवाय बाजारात विकल्या जाणार्या स्वस्तातल्या बनावट विविध प्रकारच्या सौंदर्यप्रसाधन विकणार्यांवर कारवाईचा मोठा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. तुकाराम मुंढे यापूढे काय आणि कशी कारवाई करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.



Comments