मुंबईत रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य प्रकरण: बिष्णोई गँगची थेट आरटीओलाच धमकी

मुंबई: मुंबईत रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या हालचाली सुरू असताना आता लॉरेन्स बिष्णोई गँग अमराठी भाषिकांच्या बाजूने मैदानात उतरली आहे. लॉरेन्स बिष्णाई गँग मिरा भाईंदरमधील वाहतूक विभागाचे (आरटीआ) मराठी अधिकारी नलावउे यांना धमकीचा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षा चालकांना मराठी भाषा बोलणे अनिवार्य केल्यामुळे बिष्णाई गँगने ही धमकी दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
या प्रकरणात आता परिवहन विभागाकउून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिरा भाईंदरमधील मराठी विरुद्ध अमराठी वादात आता लॉरेन्स बिष्णोई गँगने उडी घेतल्याने हा मुद्दा तपासणीची शक्यता आहे. दरम्यान, अलिकडेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात येईल, अशा सूचना दिल्या केल्या होत्या. रिक्षाचालकांना मराठी भाषा येत नसेल, तर त्यांचे परमिट काढून घेतले जातील. असंही ते म्हणाले होते. यानंतर पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आला होता.
याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील हिंदी भाषिक विभागाचे प्रमुख मनिष दुबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माझं महाराष्ट्राच्या पहरवीन मंत्र्यांना विनेदन आहे की, त्यांनी एक आदेश जारी केला आहे. असा आदेश काढण्यापूर्वी त्यांनी विचार केला पाहिजे होता की, रिक्षाचालक हा मुंबईतील वाहतुकीचा करणा आहेत. आपल्या पैशाने परमिट घेऊन, कर्ज काढून रिक्षा चालवतात आणि मुंबईतील लाखो प्रवाशांना सुविधा पुरवतात. अशा ठिकाणी तुम्ही भाषिक वाद आणत असाल तर ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नसल्याचा इशारा मनीष दुबे यांनी दिला.
रिक्षाच्या परमिटसाठी मराठी भाषा सक्तीची केली तर तुम्हाला किती मराठीचे शिकवणी वर्ग सुरु करावे लागतील. आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून लोकांना मराठी शिकवण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला असात आदेश काढायचाच असेल तर रिक्षाचालकांना मराठी शिकवण्यासाठी सहा महिने ते एक वर्षचा वेळ द्या. 1 एप्रिल 2027 पर्यंत मुराठी आली नाही तर तुमचं परमिट रद्द होईल, असा आदेश असेल तर आम्ही त्याला समर्थन देऊ, पण एका महिन्याची वेळ देऊन असा आदेश जारी केला तर तो आम्हाला मान्य नाही. आम्ही त्याविरोधात आंदोलन करू, असे मनीष दुबे म्हणाले होते. कोणतीही भाषा शिकण्याचे वय नसते, मराठी भाषा आली पाहिजे पण त्यासाठी वेळ दिला पाहिजे असेही दुबे म्हणाले.



Comments