top of page

अजित पवार यांच्या घरासमोरील भानामाती प्रकाराशी अशोक खरातचा संबंध; अवघ्या 34 सेकंदात खरातचे 6 मोठे व्यवहार, अंजली दमानिया यांचे पत्रकार परिषदे स्फोटक दावे

अजित पवारांच्या पुण्यातील घराबाहेर ज्या दिवशी भानामतीचा प्रकार घडला त्याच दिवशी अशोक खरातने एका हॉटेलमध्ये बसून पैशांचे मोठे व्यवहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. 17 जानेवारी रोजी अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार झाला आणि त्याच दिवशी अशोक खरातने 34 सेकंदात मोठे व्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताशी अशोक खरातचा काही संबंध आहे का याचा तपास करावा अशी मागणी त्यांनी केली.


अंजली दमानिया यांनी बुधवारी पत्रकार परिषद्वारे माध्यमांशी संवाद साधला,यावेळी त्यांनी खरात प्रकरणी अनेक स्फोटक दावे केले ज्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. रुपाली चाकणकरांसोबत त्यांनी अनेक राजकीय नेत्यांचे आणि प्रशासकीय अधिकार्‍यांचे खरातसोबत संबंध असल्याचा दावा केला.


दमानिया म्हणाल्या की, “27 ते 31 जानेवारी यचा दरम्यान समता पतसंस्थेमध्ये अफाट भ्रष्टाचार झाला आहे. अजित पवारांच्या घराबाहेर 17 जानेवारी रोजी भानामतीचा प्रकार झाला होता तेव्हा अशोक खरात हा ठाण्यात आला होता. तेव्हा एका हॉटेलमध्ये फक्त 34 सेकंदात खूप मोठे पैशांचे व्यवहार झाले होते. याबाबत आता पोलिसांनी चौकशी केली पाहिजे”

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, 27,28 आणि 29 जानेवारी रेाजी 5 कोटी 33 लाखांचे व्यवहार झाले आहेत. हे पैसे कुटून आले, कोणी आणले हे शोधायला पाहिजे. आर्थिक गुन्हे शाखेकडून याची चौकशी व्हायला हवी.”


कल्पना खरातवर पाळत ठेवणं पोलिसांचं कर्तव्य होतं. आता त्या फरार आहेत. पोलिसांनी हे मुद्दाम केलं का असं संशय आहे. त्याची चौकशी होऊ नये यासाठी काहीजण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न पडतो, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.


अशोक खरात प्रकरणात बोलायला सुरू केलं तर दिवस कमी पडेल. खरातला मोठं करणारे राजकारणी आणि अधिकारी आहेत. काही राजकारणी नुसते भविष्य विचारायला गेले असतील, मात्र काही राजकारणी नक्कीच काहीतरी साध्य करायल गेले होते, असा अरोपही दमानिया यांनी केला.


रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्ट केली, त्यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे त्यांनी या प्रकरणात मीडिया ट्रायलचा आरोप केला. पण माझ्याकडे रुपाली चाकणकर यांची फोन कॉल यादी आहे. यात चाकणकरांनी खरातला 177 वेळा कॉल केला आहे. एका दिवशी त्या तब्बल 22 मिनिटं गप्पा मारत होत्या. मी एसआयटीकडे चौकशीची मागणी केली आहे. खरातशी सर्वाधिक चर्चा करणार्‍या रुपाली चाकणकर या टॉप 10 मधील दुसर्‍या क्रमांकाच्या व्यक्ती आहेत.


खरातशी संपर्कात असलेले राजकारण्यांची दमानिया यांनी नावे जाहीर केली. यामध्ये चंद्रकांत पाटील आणि पीए देशपांडे, नितीन पवार, उदय सांगळे, पद्मश्री पोपट पवार, दादा भुसेंचे पीए खेडकर, विखे पाटीलयांचे पीए राहुल रोकडे, एकनाथ शिंदे, प्रभाकर काळे, सुनील तटकरे, जयंत पाटील, रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर आणि इतर


प्रशासकिय अधिकारी : दिपक लोंडे हे खरातच्या जवळचे आहेत, बाळासाहेब बोराडे, नंदकिशोर काटोरे हे डॉक्टर आहेत, सचिन चुबाळे, मंगेश नवाळे, राहुल देशमुख, अविनाश पोटे, कमलाकर पोटे, महेंद्र शेळके- पाटील यांचा समावेश आहे.

Comments


bottom of page