राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ; दोघांना अटक भोंदूबाबाला मध्यरात्रीच उचललं, गिरीजा राऊत यांचे गंभीर आरोप
- Navnath Yewale
- 11 hours ago
- 1 min read

माजी खासदार विनायक राऊत त्यांच्या कुटुंबीयांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणात नवे वळण आले आहे. या प्रकरणात आता दोघांना अटक करण्यात आली असून, त्यातील एका भोंदू बाबाला मध्यरात्री उचलण्यात आले आहे. यामुळे राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी राऊत कुटुंबीयांशी वारंवार संपर्क साधण्याच प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांच्या कोणत्याही संपर्काला राऊत कुटुंबाकडून प्रतिसाद मिळाला नाही, असा पोलिसांचा दावा आहे. सूनेच्या तक्रारीनुसार या प्रकरणात एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील भोंदू बाबा फिरोज शेख याला कापूरबावडी पोलिसांनी त्याला कुडाळमधून मध्यरात्री अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात गिरीजा राऊत यांच्यावर लावण्यात आलेले गंभीर आरोप आता अधिक तिव्र होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सूनेच्या तक्रारीवरून केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण राऊत कुटुंबीयांवर दबाव वाढला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गितेश राऊत यांच्या पत्नीने गिरीजाने पोलिसात राऊत कुटुंबाविरेाधात तक्रार दाखल केली आहे. गिरीजा राऊत यांनी तक्रारीमध्ये पती गितेश राऊत यांच्याविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये कौटुंबीक छळासोबतच ‘ जादुटोना विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र, गिरीजा यांनी माध्यमांसमोर तिची फसवणूक झाल्याचे खोटे आरोप केल्याचे सांगितले आहे.
अघोरी कृत्याविषयी बोलताना गिरिजा म्हणाली की, अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे घेऊन जायचे. जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता. मासाचे तुकडे अंगावरून उतरवत होते. तांब्याची तार उतरवत होते. कणकेच्या बाहुल्या, माझ्या अंगावरील न धुतलेले वापरलेले कपडे, डोक्याचे केस घेऊन उतारे करत होते. हळद खायला द्यायचे. अगरबत्ती उदी तीर्थ पेलाभरुन द्यायचे, गोमुत्र द्यायची. मुलाचं शारिरीक संबंध ठेवण्यात असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी प्लॅनिंग करून आयुष्य बरबाद केल्याचा आरोपही गिरिजा राऊत यांनी केला.



Comments