सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाचा आज 16 व्वा दिवस: प्रकृती खालावली , 7 किलो वजन घटले ; दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठींबा- उद्धव ठाकरे

नवी दिल्ली/मुंबई : पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे सोमवारी (दि.16) व्या दिवशी बेमुदत उपोषण सुरूच असून, त्यांची प्रकृती खालवली आहे. उपोषण सुरू झाल्यापासून त्यांचे वजन 7.8 किलोने घटले आहे. रक्तदाबही कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दिल्लीत जंतरमंतरवर सुरू असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ च्या वतिने सोनम वांगचुक यांच्यासह सर्व आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतिने पूर्ण पाठींबा जाहीर करत देशभरातील राजकीय पक्षांना समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केले.
कथित परीक्षा गैरव्यवहार विरोधात जंतरमंतर येथे कॉक्रोज जनता पार्टीच्या वतिने सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 23 व्वा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वांगचुक यांनी 28 जूनपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. रविवारी (दि.12) डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची नियमित तपासणी केली. यावेळी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी 60 पर्यंत तसेच रक्तदाब 104/66 मिमी एचजीपर्यंत खाली आल्याचे आढळले.
शनिवारी वांगचुक यांनी ‘ एक्स’ पोस्ट करून लोकांना इतरांमध्ये नायक न शोधण्याचे तसेच 20 जुलै रोजी आयेाजित संसद मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, सीपीआय (एमएल) लिबरेशनशी संलग्न ‘ ऑल इंडिया स्टुडंटस् असोसिएशन’ चे सदस्य नेहा, मनीष, दीपक कुमार वर्मा व आमीन यांनीही आंदोलनस्थळी आपले स्वतंत्र बेमुदत उपोषण सुरूच ठेवले आहे.
सोनम वांगचूक, अभिजित दीपके यांच्या आंदोलनाला शिवसेने (उबाठा) पूर्ण पाठिंबा: अभिजीत दिपके यांनी जो विषय उचलला तो प्रत्येक युवकाच्या भविष्यावा विषय आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटले त्याच्यानंतर आनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या कोणी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. सरकारला वेळ नाहीय, सत्ताधारी पक्षाला इतर पक्ष फोडफोडीमध्ये जास्त रस आहे पण इथे देशाचं नशीब फुटतंय, विद्यार्थी आत्महत्या करतायत त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाहीय. असं म्हणत “ तुमच्या बुद्धीमत्तेची देशाला गरज आहे, उपोषण सोडा’ असे सोनम वांगचूक यांना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून आवाहन केले
नीट पेपरफुटीचा केंद्र बिंदू महाराष्ट्रात, अटका झाल्या पुढे काय?: एका पाठोपाठ एक पेपर फुटतायत, महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्याच्या घरासमोर आंदोलनं झाली. कोणाला कारभाराची चिंता नाहीय, देशात काय चाललंय त्याच्याबद्दल कोणाला काही पर्वा नाहीय. आम्ही आपलं परदेशात फिरतो आम्हीच आपले भाड्याचे तट्टू आणून आपलं स्वागत करून घेतोय आणि सगळं काही आबादी आबाद आहे, असं भावतोय, हे चांगलं लक्षण नाही. शिवसेनेतर्फ सोनम वांगचुक, अभिजीत दीपके आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठींबा जाहीर करत आहे. ज्या-ज्यावेळी शक्य असेल तिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरुच पण आपल्या माध्यमातून देशातील सर्व पक्षांना सांगतोय आपण देखील आपआपल्या राज्यामध्ये राज्यातील प्रमुख शहरांमध्ये या युवकांना बळ मिळेल अशापद्धतीने काही प्रतिकात्मक असेल किंवा आणखी काही असेल समर्थनार्थ आंदोलन, प्रदर्शन करा जेणेकरून आपण ज्यांना देशाचे भाग्यविधाते समजतो त्या भाग्यविधात्यांनाही कळेल की आजचे जे भाग्य किंवा दुर्भाग्य विधाते आहेत हे आपल्या सोबत आहेत. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली.



Comments