रोहित पवारांचे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read

पुढरपूर: राज्यातील शेतकर्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी आणि सरकारने जाहीर केलेल्यवा कर्जमाफीतील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यसांनी शुक्रवारी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ‘शिवतीर्थ’ येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. शेतकर्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनापूर्वी पंढरपूर पोलिसांनी वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव रोहित पवार यांना नोटीस बाजावत पर्यायी जागेचवा प्रस्ताव दिला होता. मात्र, “ शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी निवडलेले आंदोलनस्थळ बदणार नाही” अशी ठाम भूमिका घेत त्यांनी नियोजित ठिकाणीच आंदोलन सुरू केले. त्यामुळे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
आंदोलनाची सुरुवात श्री संत गाडगे बाबा मठ (स्टेशन रोड) येथून करण्यात आली. त्यानंतर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला अभिवादन करण्यात आले. चौफाळा-पश्चिम द्वार मार्गे नामदेव पायरी येथे विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिक्रमा पूर्ण करून आंदोलक ‘शिवतीर्थ’ येथे दाखल होताच आंदोलनाला सुरुवात झाली.
आंदोलनादरम्यान रोहित पवार यांनी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, “विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी खुली असताना सरकार बॅरिकेड्स उभारुन अडथळे निर्माण करत आहे. मात्र, संविधानाने दिलेल्या आंदोलनाच्या अधिकाराच्या बळावर अन्नदात्यासाठीचा हा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही.” सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर टिकत नाही. सरकारच्या दबावामुळे प्रशासनाकडून अडथळे निर्माण केले जात असले तरी मनाने प्रशासनातील अनेकजण आच्यासोबत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
जाचक अटीशर्तीमुळे शेतकरी संघटनांत नाराजी: राज्य सरकारने नुकतीच 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यातील विविध अटी -शर्तीमुळे शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गुरुवारी (दि.11) मंचर येथे विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) प्रतिकात्मक होळी करुन निषेध नोंदवला होता.
अन्नत्याग आंदोलनापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तसेच नामदेव पायरीवर माथा टेकून अशीर्वाद घेतल्याचे सांगत “ अन्नदात्याच्या न्यायासाठीचा हा लढा अधिक ताकदीने सुरू राहील” असा निर्धारही रोहित पवारयांनी व्यक्त केल.



Comments