top of page

लातूर- अंबाजोगाई महामार्गावर कारचा भीषण अपघात, केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू

लातूर- अंबाजोगाई महामार्गावर रेणापूर फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेमुळे सर्वस्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

तहसीलदार गिड्डे हे स्वत:च्या कारने प्रवास करत होते. यावेळी त्यांची गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. पघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होती की त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. राकेश गिड्डे हे कार मध्ये एकटेच होते. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी दीडशे फुट घासत गेल्याचे दिसून आले. गाडी एका झाडाला धडकली होती. ते झाडही तुटले आणि गाडी पुढे गेली.

घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या अपघाताबाबत अधिक तपास सुरू असून नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गिड्डे यांच्या निधनामुळे महसूल विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments


bottom of page