मराठवाडा, विदर्भाला भूकंपाचे सौम्य धक्के नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ वाशिम जिल्ह्यात जाणवले धक्के
- Navnath Yewale
- Apr 11
- 1 min read

महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात शनिवारी (दि.11) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिमसह यवतमाळमध्ये भूूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची नोंद आहे. तर काही ठिाकणी भूकंपाची तिव्रता जास्त असल्याने घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. दरम्यान घराच्या छतावरील पत्रे हादरल्याचे यावेळी जावले. अचानक सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. हे भूकंपाचे धक्के सकाळी अंदाजे 8:46 वाजता जाणवल्याची प्राथकमिक माहिती आहे.
हिंगोली जिल्ह्यात शनिवारी सकाळी 8:47 वाजता सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. जिल्ह्यात अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मात यावेळेसचा भूकंपाचा धक्का हा मोठ्या प्रमाणात जाणवल्याचा नागरिक सांगतात. भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर घरामध्ये रॅकवर ठेवलेली भांडी, वस्तू जमिनिवर कोसळून पडली. तर अनेक घरांना तडे गेल्याचेही दिसून आले आहे.
नांदेडमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. शहरातील सिडको, वजीराबाद, आनंद नगर, तरोड, सांगवी भागात हे धक्के प्रकर्षाने जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 4.7 रिस्टर स्केलचा हा भूकंप असल्याची माहिती आहे. वसमत येथील पांगरा शिंदे येथे 10 किमी खोलवर भूकंपाचे केंद्र असून भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असल्याची माहिती देण्यात आली. वाशिम शहरातील काही भागांबरोबरच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी परिसरात आणि नांदेड शहर व परिसरात हे हलके धक्के जाणवले. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाच्या वेळी भूगर्भातून मोठा आवाज आला आणि त्यानंतर जमीन हालल्यासारखे जाणवले. सुदैवाने या सौम्य धक्क्यामुळे कोठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. परंतु, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, अफवा पसरवू नये अथवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.



Comments