सासवड- जेजूरी मार्गावर पालखी सोहळ्यतील वारकर्यांचा भीषण अपघात; ट्रकची धडक बसून तिन वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची रुग्णालयास भेट ,प्रशासनाला अवश्यक सूचना
- Navnath Yewale
- 11 hours ago
- 2 min read

जेजुरी : संत ज्ञाणेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सोमवारी (दि.13 जुलै) सकाळी सासवड- जेजुरी मार्गावर वारकर्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिला वारकर्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. सासवड येथील मुक्कामानंतर सोमवारी (दि.13) सकाही माऊलींचा पालखी सोहळ्याने जेजुरीकडे प्रस्थान करण्याच्या तयारीत असतानाच हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या 4 महिलांना तातडीने जेजूरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सासवड मुक्कामी असलेल्या माऊलींचा सोहळा सकाळी जेजुरीकडे प्रस्थानाच्या तयारीत असतानाच सासवड- जेजुरी मार्गावर बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेनं सुमारे 500 मिटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर हा अपघात झाला. या दुर्घटनेत 1) नंदा पवार वय 60 वर्षे, रा. कवलापूर ता. मिरज, जि. सांगली, 2) माधवी राजाराम सलगरे वय 55 वर्षे रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली, 3) राजश्री शंकर भोसले वय 55 वर्षे रा. कसबे डिग्रस ता. मिरज, जि. सांगली यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,तर निवृत्ती उमाजी जगताप , मंगल विलास पाटील, शैलेजा दिनकर जगताप आणि नारायण महादू पडवळ हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरभोसीकर यांच्या दिंडीतील एका ट्रकची सांगली जिल्ह्यातील कसबेडिग्रस येथील दिंडीतील सात वारकरी महिलांना धडक बसली. या धडकेत तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिलां गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वारकर्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघताचा पंचनामा करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवर्इा आणि घटनेचा तपास सुरू केला आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, ट्रक चालकाची चौकशी करण्यात येत असून आवश्यक कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, आषाढी वारीदरम्यान वारकर्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वारकरी संप्रदायात शोककळा पसरली असून मृत वारकर्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट: अपघातात जखमी झालेल्या वारकरी महिलांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामणी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती घेत उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, अशा सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या. सुनेत्रा पवार म्हणाल्या,“ सासवड - जेजुरी मार्गावर आज घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या तीन वारकरी भगिनींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.”
जखमींच्या उपचाराबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. जखमींच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही आणि शासन त्यांच्या पाठीसी ठामपणे उभे असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच “ पंढरपुरच्या वारीसाठी निघालेल्या वारकर्यांची सुरक्षितता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे वाहनकचालकांनी रस्त्यावरून पायी चालणार्या वारकर्यांची विशेष काळजी घ्यावी” असं अवाहनही त्यांनी केलं. जखमी वारकरी भगिनी लवकर बर्या व्हाव्यात, अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठलाच्या चरणी केली.