top of page

VIDEO / बीडच्या शिरुरमध्ये बनावट खवा कारखाण्यावर छापा 150 किलो बनावट खवा, मानवी आरोग्यास हानीकारक रसायणाची विल्हेवाट; शिरुर पोलिस, एफडीएची संयुक्त कारवाई

बीड: बीडच्या शिरुर कासार तालुक्यात दहिवंडी शिवारात मानवी आरोग्यास हानीकारक रसायण, पामतेल यासह इतर साहित्यांच्या मिस्त्रनाने बनावट खवा तयार करून मिठाई दुकानात वितरीत करणार्‍या श्री कृष्णा केक अ‍ॅण्ड बर्फी सेंटर या खवा कारखान्यावर शिरुर पोलिस, एफडीए ने संयुक्त छापा टाकला. बुधवारी (दि.1) रात्री उशीरा करण्यात आलेल्या या कारवाईत 150 किलो बनावट खवा, भेसळयुक्त बर्फीसह मिठाईसाठा जप्त करण्यात आला.


मानवी आरोग्यास हानीकारक रसायणांचा वापर करून भेसळयुक्त खद्य पदार्थ खवा, केक, बर्फी यासह मिठाई दुकानातील भेसळयुक्त खाद्य पदार्थ तयार करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या बीडच्या शिरुर कासार तालुक्यात भेसळयुक्त खवा कारखान्यावर बुधवारी (दि.1) शिरुर पोलिस आणि एफडीएने संयुक्त छापा टाकला.

दहिवंडी शिवारात श्री कृष्णा केक अ‍ॅण्ड बर्फी सेंटर नावाने निर्मणुष्य ठिकाणी डोंगर-कपारीतील एका इमारतीमध्ये कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिस निरिक्षक श्री गाडवे यांना मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे शिरुर पोलिसांनी रात्री उशीरा या कारखान्यावर छापा टाकला. भेसळयुक्त संशयास्पद पदार्थ अढळून आल्याने बीड एफडीए विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती देऊन तत्काळ घटनास्थळावर पाचारण केले.


एफडीएच्या अधिकार्‍यांनी तपासणी कारवाई केली असता प्रथमदर्शनी अन्न सुरक्षा मानदे कायद्याचे नियमन न पाळता अस्वच्छ व अनारोग्य कारक वातावरणात बर्फी व मिल्क केक हे अन्न पदार्थ उत्पादीत करत असल्याचे अढळून आले. उत्पादनासाठी व साठवणुक केलेले कच्चे अन्न पदार्थ तसेच उत्पादीत केलेले अन्न भेसळयुक्त अन्न पदार्थ यांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. ज्यामध्ये मिल्क केक, बर्फी , खवा, रवा, रिफाइंड पामतेल, मोतीचूर दाणा, सफोतेल या पदार्थांचे नमुने घेवून ते प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले आहेत. दरम्यान प्रयोग शाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएचे श्री गाडे यांनी सांगितले.


तसेच या कारखान्यात सफोलाईट हा भेसळकारी पदार्थ आल्याने श्री अ. भा. गाढे अन्न सुरक्षा अधिकारी बीड यांनी ईसम नामे कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित वय 22 वर्षे (राजस्थान) ह. मु. दहिवंडी ता. शिरुर कासार याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 57 तसेच भारतीय न्याय दंड संहिता कलम 274, 275 नुसार शिरुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी कार्तिक यास अटक करण्यात आली आहे.


एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार , पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राजेश गाडवे व एस. आर. करकाळे सहाय्यक आयुक्त छत्रपती संभाजीनगर विभाग श्री. नि. सु. कुलकर्णी सहाय्यक आयुक्त एफडीए बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सि.सु.खंदारे, अ. दि. नरवाडे अन्न सुरक्षा अधिकारी बीड पोलिस निरिक्षक राजेश गाडवे, सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त केलेला भेसळयुक्त खवा, बर्फी व इतर खाद्य पदार्थ जेसीबी यंत्राद्वारे खड्डा घेवून निष्णाशीत करण्यात आले.

Comments


bottom of page