जरांगे पाटलांची लढाई आमच्या विरोधात नाही - मंत्री छगन भुजबळ
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे. मराठा आक्षणावरून मनोज जरांगे आणि ओबीसीनेते मंत्री छगन भुजबळ यांच्यातील शाब्दीक संघर्ष उभ्या महाराष्ट्राने अनुभवला आहे. मात्र आज मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या बैठकीत घेतलेल्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी (दि. 23 रविवार) राज्यभरातील समता परिषदेच्या पदाधिकार्यांची बैठक बोलावली होती. मंत्री भुजबळ यांनी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्यांशी संवाद साधला. समता परिषरदेच्या सर्व कार्यक्रमांची उजळणी केल्याचे सांगत छगन भुजबळ यांनी विविध मुद्यांवरप भाष्य केले. यावेळी, मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्ट रोजी होणार्या आंदोलनावरही त्यांनी आपली भूमिका मांडली, तर लक्ष्मण हाकेंकडून ओबीसींचे आरक्षण संपल्याबाबत सातत्याने होत असलेलं वक्तव्य अमान्य असल्याचे बोलून दाखवले.
कोण म्हणते ओबीसीचे आरक्षण संपले? जात पडताळणीमध्ये चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय. 2011 पासून जात जनगणना करावी ही आमची मागणी होती, त्यावर सरकारने निर्णय घेतला आहे. सरकार आमच्यासोबत आहे, त्यावर आम्ही आता काय बोलणार, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. तसेच महात्मा फुले यांचे वांगमय भाषण यावर आम्ही मागणी केली, त्यावर सरकार काम करत आहे. अशी माहितीही त्यांनी दिली.
मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही, त्यावर आम्ही काय बोलणार, सरकार त्यावर बोलतील आणि निर्णय घेतील, असे भुजबळ म्हणाले. आम्ही जात जनगणना मागणी केली, त्यावर सरकार काम करत आहे. ओबीसीमध्ये किती जाती त्यावर सरकार निर्णय घेणार आहे. प्रत्येक राज्यात ओबीसींचे नाव त्यावर आम्ही मागणी केली तो शोध घेतला जात आहे. माळी समाज हा महाराष्ट्रात आहे, जेव्हा लढायचं तेव्हा मंत्रिपदाचा राजिनामा देऊन आम्ही राज्यात फिरलो. छगन भुजबळ हा काय घाबरला? असा सवाल नाही, असे म्हणत गरज होती तेव्हा आपण लढल्याचं भुजबळ म्हणाले. तर, सरकार आमच्यासोबत आहे म्हणून चर्चेतून आम्ही मार्ग काढत आहेत, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
राज्यात एल निनोचा प्रभाव: राज्यात एल निनोचा मोठा प्रादुर्भाव सर्वत्र दिसत आहे, काही ठिकाणी प्रचंड पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी पाऊसच नाही. पुन्हा उष्णता वाढलेली आहे, हा ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम आहे, असे भुजबळ म्हणाले.
तुकाराम मुंडेचे कौतुक : तुकाराम मुंढे चांगलं काम करत आहेत, अन्न हा असा प्रकार आहे, जो श्रीमंत गरीब सर्वांसाठी आवश्यक आहे. स्वच्छता असणे हे त्यासाठी महत्वाचे आहे. तुकाराम मुंढे ज्यावर बोट ठेवतात त्यावर सगळेच मागणी करतात, तशीच मागणी अंगणवाडी समितीने केल्याचे सांगत अंगणवाडीतील भोजनव्यवस्थेवरही भुजबळांनी भूमिका मांडली.



Comments