top of page

अंतरवालीच्या सरपंचाची आरोपांवर पुराव्यासह सनसनीत चपराक: वायरमन, कामगार, कंत्राटार आणि आयटी रिटर्नचे सगळंच मांडलं; आंदोलनापूर्वीचीच उत्पनाच्या तुलनेतली कमाई

2 hours ago
2 min read

बीड: जरांगे पाटील यांच्या सहकार्‍यांच्या संपत्तीत अलिकडच्या तिन वर्षात प्रचंड वाढ झाल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात ईडी, आयकर विभागाकडे तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. अजय बारस्कर, अमोल खूने यांच्यासह ओबीसी नेते नवनाथ वाघमारे, लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप करत जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर आंदोलनातून बेहिशोबी मालमत्तेचा आरोप केला होता. अंतरवालीचे सरपंच पांडूरंग तारक यांचे पूर्वी मातीचे घर होते आता बंगला याशिवाय 13 एक्कर जमिन, संभाजीनगर येथे प्लॉट, नातेवाईकांच्या नावे जमिन असे विविध गंभीर आरोप केले आहेत. यावर जरांगे पाटील यांनी सहकार्‍यांना यावर कोणीही प्रत्यूत्तर देऊ नये, होणार्‍या चौकशीला सामोरं जाण्याचं अवाहन केल्या नंतरही एका यूट्यूब चॅनलवर पांडूरंग तारक यांनी पुराव्यासह आरोपाचे खंडन केल्याने त्यांच्यावरील बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांना झणझणीत चपराक दिली आहे.


जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी मराठा आंदोलनाच्या आडून आमाप बेहीशोबी मालमत्ता गोळा केल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. मात्र, या आरोपांवर जरांगे पाटील यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. या उलट आरोपांच्या तक्रारीनुसार चौकशीला सामोरं जाण्याचा थेट इशारा दिला आहे. मराठा आंदोलनात सन 2023 पासून किंबहूना त्या पूर्वीपासूनही जरांगे पाटलांच्या अवती भोवती असणार्‍या सहकार्‍यांना लक्ष करून मला एकटं पाडण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप जरांगे पाटील आंदोलनावेळी सातत्याने करत आले आहेत.


त्यानुसार याचे पहिले लक्ष ठरले गंगाधर काळकुटे यांच्यावर अजय बारस्कर यांनी पुण्यातील चंदनगर येथे कोट्यावधींची जमिन खरेदीचा आरोप केला. त्यानंतर जरांगे पाटील यांचे बंधू भाऊसाहेब जरांगे यांच्या जमिन खरेदीवरून जरांगे पाटील यांच्यावरही बारस्कर यांनी निशाना साधला होता. त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्या नेहमी सोबत असलेले अंतरवालीचे सरपंच पांडूरग तारख मातीच्या घरातून थेट कोट्यावधीच्या बंगला, वर्डीपार्जीत केवळ दोन एक्कर जमिनीतून थेट वीस एक्कर जमिन आंदोलनाच्या आडून कमवलेल्या काळ्या पैशातून खरेदी केल्याचा गंभीर आरोप अजय बारस्कर यांनी केला. त्याचबरोबर पांडुरंग तारख यांनी संभाजीनगर येथे महागड्या किंमतीचा प्लॉट घेतल्याचा आरोपही बारस्कर यांनी केला होता.


अजय बारस्कर यांच्या आरोपानंतर सरपंच पांडूरंग तारख यांनी एका यूट्यबरला दिलेल्या मुलाखतीत बारस्कर यांच्या सर्व आरोपांचे थेट रजिस्ट्रीच्या नकला तारखांसहीत पुरावेच देत खंडन केले. अजय बारस्करप यांच्या आरोपानुसार पांडूरंग तारख यांनी केवळ एक वायरमनच्या कमाईतून एवढी संपत्ती कशी गोळा केली. ती आंदोलनाच्या आडून कमवलेल्या काळ्या पैशातून. असा अरोप केला होता. त्यावर पांडूरंग तारख यांनी आपण सन आयटीआय डिप्लोमा करून सन 2005 मध्ये कामगार म्हणून काम केले. सन2007 मध्ये एका कंपनीत नोकरी केली. त्यानंतर वायरमनची कामे कंत्राटीपद्धतीने घेण्यास सुरूवात केली. आजतागायत 14 करोड रुपयांचा टर्नवर असल्याचं सांगत बारस्कर यांनी केलेल्या प्रत्येक आरोपांवर पांडूरंग तारख यांनी मालमत्ता खरेदीच्या रजिस्ट्रीच्या नकला तारीवार दाखवून बारस्कर यांच्या आरोपांचे खंडन केले. प्रत्यक्षात जमिन खरेदी पासून घर बांधकाम, प्लॉट खरेदी, तीन वाहनांच्या कच्चा चिठ्ठाच पुरव्यासह मांडला.


विशेष म्हणजे सर्व मालमत्ता खरेदी सन 2022 पूर्वीच असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करत समाजकार्य करत असलो तरी माझा मुळ व्यवसाय, जमिनीतील उत्पादनावर मी वाहन व मालमत्ता खरेदी नाही करावी का? समाजकार्यात सहभाग घेणं म्हणजे काही खरेदी करण्यापूर्वी विचारुन करावं लागणार आहे का? प्रत्यक्षात सादर केलेल्या पुरव्यानुसार आंदोलन सूरु झाल्यापासून कुठल्याच मालमत्ता खरेदी झालेली नाही. संंभाजीनगर येथील प्लाट चौघा जणांच्या भागिदारीने घेतला आहे तोही व्यवसाय उभारणीसाठी असा दावाही सरपंच पांडूरंग तारख यांनी केला. पांडूरंग तारख यांनी बारस्कर यांच्या आरोपांना पुराव्यानिशी सडेताड आणि जशात तशी चपराक दिल्याने जरांगेसह त्यांच्या टिमवर आरोप करणार्‍यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Comments


bottom of page