ठाणे हादलं: शिवसेना ठाकरे पक्षाच्या विभाग प्रमुखाची गोळ्या झाडून निर्घुन हत्या कुटुंबीयांचे माजी महापौर शिंदेंवर गंभीर आरोप, समर्थकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा; राऊत, ठाकरे पोलिस ठाण्यात

ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळू) पुर्णेकर यांच्यावर ठाण्यात मंगळवारी (दि. 29) रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. मनोरमानगर परिसरताील आर मॉलजवळ पुर्णेकर यांच्यावर दोन राऊंड फायर करण्यात आले. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरुन पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेत पुर्णेकर यांना तातडीने जवळच्या इन्फिनिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्रदीप पुर्णेकर हे मंगळवारी रात्री आर मॉलजवळून जात असताना हल्लेखोरांनी त्यांना लक्ष केले. हल्लेखोरांनी अचानक दोन राऊंड गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यातली एक गोळी त्यांच्या छातीत तर दुसरी गोळी त्यांच्या मांडीत घुसली. गोळीबार केल्यानंतर मोरकर्यांनी धारदार शस्त्राने देखील पुर्णेकर यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थावरुन पसार झाले. गोळी लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुर्णेकर यांना स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तातडीने आर मॉलजवळील इन्फिनीटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र जखम खोलवर असल्याने आणि अधिकरक्तस्त्रावामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांसह ठोण गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अपर पोलिस आयुक्त अशोक दुधे रुग्णालयात दाखल झाले. मानपाडा परिसरातील क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राजकीय वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकउून करण्यात येत आहे. याप्रकरणी एकाजणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ठाण्याच्या मानपाड्यातील गणेश नगरमध्ये अचानक गोळीबाराचा आवाज आला. आणि एकच खळबळ उडाली त्यानंतर काहीच क्षणात ठाकरेंच्या शिवसनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांना रक्तबंबाळ अवस्थेत काहीजण घेऊन जाताना दिसले. पूर्णेकर कार्यालयात एकटे असताना हल्लेखोरांनी 6 गोळ्या झाडल्या आणि त्यानंतरही ते जिवंत असल्याचं पाहून कोयत्यानं त्यांच्या मानेवर आणि छातीवर वार करण्यात आले. पूर्णेकर यांच्या हत्येआधी रेकी करताना हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
हत्या करण्याआधी हल्लेखोरांनी रेकी केल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्ट होत आहे. हल्लेखोर आधी पूर्णेकर यांच्या कार्यालया समोरुन पुढे गेले. जवळच्या मैदानात थांबले आणि हल्ला कसा करायचा याचं प्लॅनिंग केलं कार्यालयात पूर्णेकर एकटेच असल्याचे समजताच हल्लेखोर मैदानातून त्यांच्या कार्यालयाकडे निघाले हत्येच्या दोन दिवसांआधी पासून पप्पा शिंदे पूर्णेकर यांच्या कार्यालयात येऊन बसत होता.
दरम्यान, मंगळवारी हत्येच्या वेळीदेखील पप्या शिंदे पूर्णकरांच्या कार्यालयात बसला होता. कार्यालयात केवळ दोघांनाच बसण्याची जागा असल्यानं हे दोघं सोबत असतानाच हल्लेखोर आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पूर्णेकर एकटे असल्याची टीप पप्या शिंदेंनीच दिल्याचं तपासात समोर आलं आहे. सोबत शूटर नावाचा आरोपी होत, या दोघज्ञंनी गोळ्या मारल्याची माहिती आहे. तर इतर दोन आरोपींनी चोपर आणि चाकूने हल्ला केला. त्यानंतर, हे चौघे पळून गेले पण पप्या शिंदे तिथेच होता. प्रदिप यांना हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत पप्या शिंदे सोबत होता. पण त्याच्यावर पोलिसांना संशय आला म्हणून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलं आहे.
पोलिस तापासात चौघा आरोपींची नावं उघड झाली आहेत. पप्या शिंदे, निखील यादव, नितीन पवार, संतोष कनोजिया यांनी पूर्णेकरांची निर्घुण हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी पप्या शिंदेला अटक केली आहे. या प्रकरणी पूर्णेकरांच्या कुटुंबियांनी माजी महापौर मिनाक्षी शिंदेवर गंभीर आरोप केले आहेत. पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यात प्रचंड तणाव निर्माण झाला असून मनोरमा नगर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पूर्णेकर कुटुंबानं ठाण्यातील कापरबावडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदेालन केलं. पूर्णेकर यांच्या हत्येचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत.
..तो पर्यंत पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाहीत:
पुर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी पप्या शिंदे यास अटक केली आहे. तसेच एका इतर चार आरोपींची देखील ओळख पटली असून पोलिसांची 9 पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हत्या प्रकरणी पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाणे महापालिकेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पती राजेंद्र शिंदे यांचं नाव घेत कट रचल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा एफआरमध्ये शिंदे दम्पत्याचं नाव घेऊन अटक करा, अशी भूमिका पुर्णेकर कुटुंबीयांनी घेतली. तसेच जोपर्यंत त्यांचे नाव एफआयआर मध्ये घेतले जाणार नाही,तोपर्यंत प्रदीप पुर्णेकर यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करणार नाही, अशी भूमिका पुर्णेकर कुटुंबियांनी घेतली.
कार्यकर्त्यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा:
प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबियांसह ठकारे गटाचे शेकडेा कार्यकर्ते आज दुपारपासून कापूरबावडी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. प्रदीप पुर्णेकर यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव थेट कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या परिसरात आणण्यात आला आहे. जोपर्यंत मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीचे नाव एफआयआरमध्ये घेतलं जात नाही आणि त्यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत प्रदीप पुर्णेकर यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका पुर्णेकर कुटुंबांची आहे.
ठाकरे, राऊत पोलिस ठाण्यात:
कापूरबावडी पोलिस ठाण्याबाहेर मोठा जामाव दुपारपासून आहे. तसेच या घटनेमुळे ठाण्यातील वातावरण तापलं आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि आमदार अदित्य ठाकरे हे ठाण्यात दाखल झाले. त्यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात जात पुर्णेकर कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी ठाण्याचे सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेतली. या प्रकरणी पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांच्या आरोपांनुसार हत्येच्या सूत्रधारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार राऊत यांनी ठाण्याचे सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे केली. तसेच एफआयआरला पुर्णेकर यांच्या मुलाचा आणि भावाचा जबाब जोडण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. यानंतर पोलिसांनी एफआयआरमध्ये प्रदीप पुर्णेकर यांच्या मुलाचा आणि भावाचा जबाब घेतला.



Comments