फॉर्म-6 बाबतचा ‘तो’ नियम अखेर रद्द: प्रचंड विरोधानंतर निवडणुक अयोगाचं मोठं पाऊल

नवी दिल्ली: मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी वापरल्या जाणार्या फॉर्म -6 संदर्भात निवडणूक आयोगाने महत्वाचा बदल केला आहे. एसआयआर प्रक्रियेशी संबंधित अतिरिक्त घोषणा पत्र आता काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील फॉर्म -6 मधून हटवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी एसआयआर प्रक्रिया पूर्ण भरावा लागणार आहे.
बुधवारी रात्रीपर्यंत ईसीआय नेट पोर्टल तसेच संबंधित राज्यांचा मुख्य निवडणुक अधिकार्यांच्या वेबसाइटवर हा बदल दिसून आला. मात्र, ज्या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिय अद्याप सुरू आहे, तिथे फॉर्म-6 सोबतचे अतिरिक्त घोषणा पत्र कायम असल्यवाचे दिसत आहे.
मतदार यादीच्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान फॉर्म-6 च्या ऑनलाइन अर्जात एक अतिरिक्त भाग जोडण्यात आला होता. या घोषणेमध्ये नव्या मतदारांकडे किंवा त्याच्या आई-वडिलांकडे अथवा आजी-आजोबांकडे मागील एसआयआर दरम्यान तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत नाव होते का, अशी माहिती विचारली जात होती. नाव असल्यास बूथ आणि क्रमांकाची माहिती देण्यासही सांगितले जात होते.
या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमिवर 26 सप्टेंबर रोजी झालेल्या पूर्ण निवडणूक अयोगाच्या बैठकीकडेही लक्ष वेधले जात आहे. त्यानंतर एसआयआर पूर्ण झालेल्या राज्यांमध्ये फॉर्म-6 वरील अतिरिक्त घोषणा पत्र हटवण्यात आल्याचे दिसून आले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने फॉर्म-6 मध्ये थेट कोणताही बदल केल्याचा दावा नाकारला होता. आयोगाच्या म्हणण्यानुसार, नियमित फॉर्म-6 मध्ये सुधारणा करण्यात आलेली नव्ही, तर एसआयआर प्रक्रियेसाठी त्यासोबत अतिरिक्त घोषणा पत्र जोडण्यात आले होते. आता एसआयआर पूर्ण झालेल्या ठिकाणी ही अतिरिक्त माहिती मागणव्याची गरज नसल्याने ती व्यवस्था हटवण्यात आली आहे.



Comments