अजित दादांचा अपघात नेमका कसा घडला? डिजीसीए ने दिली इनडिटेल माहिती; पहिला प्रयत्न फसला , गो-अराउंड केलं अन्..
- Navnath Yewale
- 7 days ago
- 2 min read

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:खद निधन झाले आहे. आज सकाळी अजितदादा मुंबईहून बारामतीला जात असताना बारामती एअरपोर्ट येथे लँडिंगवेळी हा अपघात झाला. अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला याबाबत प्राथमिक माहिती आता हळूहळू समोर येत आहे. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघालेले चार्टर विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले आणि या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे.
सकाळी 8:10 वाजता हे चार्टर विमान मुंबई विमानतळावरून उड्डाणासाठी रवाना झाले होत. उड्डाणाचा कालावधी साधारण 35 ते 40 मिनिटांचा असल्याने विमान वेळेत बारामतीच्या दिशेने पुढे सरकत होते. मात्र. बारामती परिसरात त्यावेळी दाट धुके आणि कमी दृृश्यता असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
विमानाने बारामती विमानतळावर लँडिंगसाठी पहिला प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे पायलटने सुरक्षिततेच्या दृष्टीने गो- अराउंड करत विमान पुन्हा हवेत घेतले. त्यांनतर दुसर्यांदा लँडिंगसाठी अप्रोच घेत असताना अचानक काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसर्या प्रयत्नादरम्यान विमानाचा ताबा सुटल्याने ते धावपट्टीच्या थोड्याच अंरावर कोसळले.
दरम्यान, रनवेच्या थ्रेशोल्डजवळ विमान जमिनीवर आदळले आणि जोरदार स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. काही अहवालांनुसार विमान धावपट्टीपासून सुमारे 100 फूट आधीच कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमान पूर्णपणे जळून खाक झाले.
या विमानात अजित पवार, त्यांचे एक पीएसओ, एक अटेंडंट आणि दोन क्रू मेंबर्स -पायलट असे एकून सहा जण होते. दुर्दैवाने या अपघातातून कोणीही वाचू शकले नाही, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली आहे.
अपघातानंतर डीजीसीए आणि एअरक्राप्ट अॅस्किडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांनी संयुक्तपणे चौकशी सुरू केली आहे. अपघातस्थळी पडलेले अवशेष तपासले जात असून ब्लॅक बॉक्स (फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हाइस रेकॉर्डर) शोधण्याचे काम सुरू आहे. हवामानाची स्थिती, पायलट-एटीसी संवाद, विमानाची तांत्रिक स्थिती आणि लँडिंगदरम्यान घडलेल्या घडामोडींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
सध्या समोर आलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची असून अंतिम कारण चौकशी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत या दुर्घटनेने निर्माण केलेली हळहळ आणि प्रश्नचिन्हे कायम आहेत.



Comments