top of page

अजित पवार- महेश लांडगे वादात मुख्यमंत्री फडणवीसांची एन्ट्री मुख्यमंत्री फडणवीसांचा महेश लांडगेंना कानमंत्र

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मनात नेहमीच एक सल कायम राहिली आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे बोलूनही दाखवल्याचं दिसून आलं आहे. एवढी विकासाची कामे करूनही पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नागरिकांनी का नाकारलं आता अजित दादांनी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जोर लावला आहे.

यावेळी त्यांनी कशाचीही पर्वा न करता थेट राज्याच्या सत्तेत एकत्र नांदत असलेल्या महायुती मित्रपक्ष भाजपवरही गंभीर आरोप केले आहेत. यात भोसरीचे आमदार महेश लांडगेंना टार्गेट केलं आहे. लांडगेंनीही अजितदादांनवर जशास तसा पलटवा केला आहे. आता अजितदादा विरुद्ध लांडगे वादात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एन्ट्री घेतली आहे.


मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी आता पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आमदार महेश लांडगे अन् राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यातील पेटलेल्या वादात उडी घेतली आहे. ते म्हणाले की, आपलं काम बोलतंय, त्यामुळे हा वैताग, त्रागा आणि रागाराग आहे.पण महेशदादा जरा समजून घ्या ते रागावले म्हणून तुम्ही रागावू नका. त्यांना सांगायला काम नाही. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात, त्यांच्याकडे उत्तरं नाहीत. याचमुळे त्यांना आरोप- प्रत्यारोपात ही निवडणुक गुंतवून ठेवायची असल्याचा आरोपही त्यांनी केला.


त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीसांनी महेश लांडगे यांना महत्वपूर्ण सल्ला दिला. ते म्हणाले आपण विकासाच्या मुद्यांवर बोलत राहायला हवं. म्हणजे आरोप- प्रत्यारोप करत बसण्याची वेळच येणार नाही. महेशदाद तुम्ही टीका करू नका, फक्त आपण केलेल्या कामांची आठवण करून द्या. म्हणजे दादा टीका करण्याची गरज पडणार नाही, असा सल्लाच फडणवीसांनी महेश लांडगेंना दिला.


‘ परिंदे को मिलेगी मंजिल एकदिन, ये उनके फैले हुये पंख बोलते है। और वही लोग जो खामोश रहते है, अक्सर जमाने मे जिनके हुनर बोलते है। या शेरोशायरीतून फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, आमचे महेश लांडगे जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की, अनेकांना कंठ फुटतो. अनेकजण आरेाप करत आहेत. एकतात्र मी सांगू इच्छितो की, याठिकाणी आपलं काम बोलतंय


दरम्यान फडणवीसांच्या टोलबाजीनंतर आणि भाजप आमदार महेश लांडगेंना दिलेल्या सबुरीच्या सल्ल्यानंतर पिंपरी चिंचवडचं राजकीय वादावर पडदा पडणार की धग कायम राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रचारात स्थानिक भाजप आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यातील वाद पेटल्याचं दिसून आलं होतं. अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर महेश लांडगेंनी अजित पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख करत, आम्ही काय बांगड्या भरल्या नाही, जन्मत:च लंगोट घालणारे आम्ही आहोत, असे म्हणत खुलं आव्हान दिलं होतं.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी- चिंचवडमध्ये सभा घेत आमदार महेश लांडगेंवर नाव न घेता निशाणा साधला होता. भ्रष्टाचार्‍याच्या आकाला संपवायचे आहे. असे म्हणत रिंग करून महापालिकेत भ्रष्टाचार केला जात असल्याचे ते म्हणाले होते. अजित पवारांच्या या आरोपानंतर महेश लांडगे यांनी देखील जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.


महेश लांडगे म्हणाले, ज्या महापालिकेत कधी काळी आपण कारभारी होतो. त्या महापालिकेत 128 जागांवर उमेदवार देऊ शकलो नाही याचे नैराश्य अजित पवारांना आहे. ज्या पक्षाकडे कधीकाळी उमेदवारी घेण्यासाठी फार इच्छुक असायचे त्या पक्षाला सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नाहीत. अजित पवारांची आरोप करण्याची जी सवय आहे आत्ताची नाही. मी राजकारणात आलोय तेव्हापासून बघतोय निवडणूक आली की आरोप करायचे, याशिवाय त्यांना काही जमलं नाही


भाजप आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांवर शाब्दिक हल्ले चढवले. विकासावर बोला, एवढे दिवस पालकमंत्री म्हणून तुम्ही काम केलं तरी देखील तुम्ही आरोपच करणार का? ते पण खोटे आरोप.; असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. यावेळी त्यांनी आधी आपल्या लेकाचं बघा काय झालं ते, भाजपसोबत आल्याने तुम्हाला तुमचे गुन्हे लपवता येणार नाही. तुम्ही आत्मचिंतन करा, आत्मपरिक्षण करा, असा सल्ला देखील अजित पवारांना दिला. तसेच ते अस्वस्थ झाले आहेत. कारण त्यांना 128 उमेदवार उभे करता आले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Comments


bottom of page