top of page

...अन्यथा महानगरपालिकेतील सर्व उमेदवार पाडू- जरांगे पाटील पुण्यात एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाला जरांगे पाटलांचा पाठिंबा; सकरने तत्काळ मार्ग काढण्याचा इशारा


पुणे: पुण्यात मध्यरात्री अचानक एमपीएससी च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. शासनाची जाहिरात उशिरा लागल्याने वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याच्या मुख्य मागणीसाठी लाखो विद्यार्थी मध्यरात्री 1:30 च्या सुमारास शास्त्री रोडवर गोळा झाले. अचारसंहितेमुळे विद्यार्थ्यांना आदेालनास परवानगी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आज मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारला इशारा दिला आहे.


राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच पुण्यात एमपीएससी करणार्‍या विद्यार्थ्यांनी काल मध्यरात्री 1:30 वाजाता आंदोलन सुरू केलं. पोलीस उपनिरिक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने व वयोमर्यादा वाढीच्या मागणीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. पुण्यातील शास्त्री रोडवर बसून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.


पोलिस उपनिरिक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशीरा प्रसिद्ध झाल्याचे सांगत या पदाची वर्यामर्यादा एका वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यीरातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी करत आहेत. यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही सरकार दखल घेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.


पुण्यातील शास्त्री रोडवरती स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी आदेालनाचा पावित्रा घेतला. विद्यार्थी आंदोलकांना मध्यरात्री रस्त्यावरून पोलिसांनी हटवले. आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनाची परवानगी विद्यार्थ्यांना नव्हती.


दरम्यान, अश्यातच आता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आपले सर्व दौरे रद्द करून अचानक पुण्यात दाखल झाले आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी जरांगे पाटील यांनी पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देवून विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. जरांगे पाटील यांच्या भेटीमुळे आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाली आहे.


जरांगे पाटील यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधत सकरकारला इशारा दिला. जरांगे पाटील म्हणाले की, मी माझे सगळे दौरे रद्द करून अचानाक पुण्याला आलो आहे. एक ते दिड लाख एमपीएससी ची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्यांची चूक नसतानाही त्रास दिला जातोय. सरकारच्या चुकीमुळे एक ते दीड लाख एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वार्‍यावर सोडणार असला तर मोठी शोकांतिका आहे.


मी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीसोबत आणि विखे पाटलांसोबत देखील चर्चा केलेली आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने मार्ग काढा असं मी मुख्यमंत्री यांच्याकडे निरोप पोहोचवला आहे. सरकारच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आली आहे. त्यामुळे तात्काळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नावंर योग्य मार्ग काढून त्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा महानगरपालिकेतील सर्व उमेदवारांना पाडू असा इशराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Comments


bottom of page