अभिजीत दिपकेंनी पोलिस अधिकार्याला घराबाहेर काढले; भेटीसाठी येणार्या नगारिकांशी उद्धट वागणूकीचा दिपकेंचा आरोप
- Navnath Yewale
- 6 hours ago
- 1 min read

छत्रपती संभाजीनगर : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यसांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिपके आणि एका पोलिस अधिकार्यामध्ये घरातच शाब्दिक वाद झाल्याचे दिसत असून,दिपके संबंधित अधिकार्याला आपल्या घरातून बाहेर जाण्यास सांगताना दिसत आहेत.
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी काही नागरिक त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या एका पोलिस अधिकार्याने आलेल्या नागरिकांशी अयोग्य पद्धतीने संवाद साधल्याचा अरोप दिपके यांनी केला. यामुळे वातावरण अचानक तापले आणि दिपके यांनी थेट त्या अधिकार्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
व्हिडिओमध्ये दिपके संबंधित अधिकार्याला त्यांचे पोलीस ठाणे, पद आणि ओळख विचारताना दिसतात. तसेच उपस्थितांना त्या अधिकार्याचे नाव नोंदवून ठेवण्यासही सांगतात. दिपके यांचा आरोप असा आहे की, त्यांच्या घरी येणार्या नागरिकांशी पोलिसांनी उद्धटपणे वागू नये, घरात कोणाला भेटायचे आणि कोणाशी चर्चा करायची, हा निर्णय आपणच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माझ्या घरात अशी वागणूक चालणार नाही: वाद अधिक तीव्र होत असताना दिपके यांनी संबंधित पोलीस अधिकार्याला घराबाहेर जाण्यास सांगितले. आपल्या घरी येणार्या लोकांशी अशा प्रकारची भाषा किंवा वागणूक स्वीकारली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. या घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या काही जणांनी संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला.



Comments