top of page

महाराष्ट्रात पुन्हा भगवं वादळ, जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर

जालना: कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करून सरकारने मराठ्यांचा घात करत आहे. आरक्षण द्यायला हेच आणि विरोध करायलाही हेच म्हणत जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत सरकारवर गंभीर आरोप केले. मराठवाड्यात सापलेल्या 58 लाख नोंदीसह गॅझिटिअर प्रमाणे कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपासाठी पुन्हा 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. कुणबी जात प्रमाणपत्र वैधता रद्द प्रकरणावरून जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करत 29 ऑगस्टच्या नियोजीत आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आज शुक्रवार पासून मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत.


मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं म्हणत आज शुक्रवार (दि.7) पासून दौरा सुरू केला आहे. मराठा आरक्षणासाठी गरजेच्या नोंदी रद्द करण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे. खरंतर सरकारकडून पूर्वनियेाजित कट रचला जात आहे, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे. पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मनोज जरांगे आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर जाणार आहे. जरांगे यांचा 12 ऑगस्टपर्यंत दौरा असणार आहे. या दौर्‍याआधी मनोज जरांगे यांनी पुन्हा सरकारला लक्ष्य कलं. मनोज जरांगे म्हणाले, सत्ताधार्‍यांना सातारा संस्थान आणि कोल्हापूर संस्थानचं गॅझेटीअर द्यायचं नाही. 5 लाख नोंदी द्याच्या नाहीत. त्यांना ननोंदी रद्द करायच्या आहेत. सरकारने पूर्वनियोजित कट रचला आहे. मी यांच्या मुंडक्यावर पाय देऊन घेतल्याशिवाय राहत नाही. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार होतो, परंतु पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी पक्षाला मोठं केलं.


‘ आता त्यांच्या लेकरा- बाळांसाठी लढावं लागणार आहे . जमिनी कमी होत आहेत. उत्पन्न कमी होऊ लागलं आहे. उत्पादनांना भाव नाही. मुलांना नोकरी मिळाली पाहिजे. शिक्षण महाग झालं आहे. त्यामफॅळे शिक्षणात सवलती मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍याला आज पासून सुरूवात करत आहे. सर्वांच्या गठी भेटी घेणार आणि मराठवाडा विदर्भाचा देखील दौरा करणार आहे. मराठ्यांनी सत्तेवर बसवलं आहे. शिवसेनेच्या कार्यकत्यांना आरक्षण लागणार नाही का? नेत्यांचे बंगले बघून पोट भरणार आहे का? भाजप मंत्र्यांचा बंगला बघून आपलं पोट भरणार आहे का असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.


‘ गरीब मराठ्यांचं वाटोळं करण्याचं काम सुरू आहे. भाजप - शिवसेना- राष्ट्रवादीतील नेत्यांचे मुले पैसे देऊन परदेशात शिकतात. परंतु कार्यकर्त्यांची मुले परदेशात शिकू शकत नाहीत. आमच्या अंगी कार्यकर्ता म्हणून गरीबी आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी लढत आहे. जातीचे उपकार विसरायचे नाहीत. कार्यकर्ते पक्षाचे उपकार नसताना त्यांच्यासाठी काम करत आहे. मी कितीही वाटोळे करा. मी आरक्षण घेऊनच राहणार आहे. आरक्षण रद्द कसं करतात, ते मी पाहतोच असं खुलं अवाहनही जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

Comments


bottom of page