अवकाळी पावसात विज कोसळून दोन तरुणांचा मृत्यू एकजण गंभीर भाजला; महाकाळा येथील दुर्दैवी घटनेने शोककळा
- Navnath Yewale
- Mar 30
- 1 min read

जालना: अवकाळी पासात झाडाच्या अश्रयाला थांबलेल्या तरुणांचा झाडावर विज कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.30) सायंकाळी 6:00 च्या दरम्यान महाकाळा (ता.अंबड) येथे घडली.
सोमवारी (दि.30) मराठवाड्यात सर्वत्र जोरदार वार्यासह विजांच्या कडकडाटाने अवकाळी पावसाने हजेरी लावली. महाकाळा येथील गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21), अदित्य दगडू बेद्रे (वय 20) हे जवळच असलेल्या विजानेश्वर अपेगाव येथे देवदर्शनसाठी जात होते. महाकाळा-साष्टा पिंपळगाव रोड वरुन जात असताना अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला.
पावसापासून बचावासाठी त्यांनी रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाचा अश्रय घेतला. मात्र, अवकाळीच्या कहराने त्यांना लिंबाच्या झाडाचा अश्रय आउट घटीकेचा ठरला. हे तरुन ज्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते त्याच झाडावर अचनाक विज कोसळली यामध्ये त्या दोघां तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला तर एकजण गंभीर भाजल्याने (जखमीचे नांव कळू शकले नाही) त्यास जखमी अवस्थेत संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. महाकाळा- साष्ठे पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती या ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनेने महाकाळा गाव परिसरात शोककळा पसरली आहे..



Comments