top of page

प्रेमभंगाच्या विस्फोटात उडाल्या एमपीएससीच्या पेपरफूटीच्या ठिकर्‍या!

मुंबई: गर्लफ्रेण्डसाठी काहीतरी करायला पाहिजे, या भावनेने प्रियकराने एमपीएससीच्या अधिकार्‍यांशी हातमिळवणी करत औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेचे काही प्रश्न तिला मिळवून दिले. त्यामुळे प्रेयसी परीक्षेत सातवी आली, औषध निरीक्षक झाली आणि तिने लगेच ब्रेकअपही केलं. प्रेमभंग झाल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने पोलिसांना याची टिप देऊन पर्दाफाश केला.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवाररी सहा जणांना अटक केली. यामध्ये ‘एमपीएससी’ च्या तीन अधिकार्‍यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गर्लफ्रेंण्डसाठी काहीतरी करायला पाहिजे, या भावनेने एका तरुणाने एमपीएससीच्या अधिकार्‍यांशी हातमिळवणी करत औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेचे काही प्रश्न प्रेयसीला मिळवून दिले. तरुणी परीक्षेत सातवी आली, औषध निरीक्षक झाली आणि तिने ब्रेकप केलं. त्यामुळे प्रेमभंग झालेल्या प्रियकराने पोलिसांना याची टिप देऊन पर्दाफाश केला.


अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन या संवर्गाची चाळणी परीक्षा 22 मार्च 2026 रोजी ‘ एमपीएससी’ मात्र, परीक्षा होण्यापूर्वी काही दिवस आधी तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नसंचातून काही प्रश्न प्राप्त करून, त्याचा वेगळा प्रश्नसंच तयार करून तो पुढे इतर व्यक्तींना देण्यात आला, अशी माहिती लोकेश उर्फ गौरव पाटील या तरुणाने‘ एमपीएससी’ ला दिली. या माहितीमधील तथ्य पडताळण्यासाठी याबाबतचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला.

पोलिस उपायुक्त राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कक्षाचे मंगेश देसाईयांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने गौरव याला ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केली. यामध्ये गौरव याने सांगितलेली माहिती पडताळण्यात आली. प्राथमिक चौकशीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा अयोगाच्या परीक्षा प्रक्रियेतील गोपनियतेचा भंग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.


आरोपींपैकी एक असलेला, पेपरफुटीची माहिती देणार लोकेश उर्फ गौरव पाटील आणि एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. ही तरुणी औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेला बसली होती. तिच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असा विचार करून गौरवने योजना आखली. प्रवीण पाटील तरुणीला दिले. तरुणी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. यामुळे तिच्यासोबत आपली जवळीक अधिक वाढेल, असे गौरव याला वाटले होते. औषध निरीक्षक होताच तरुणीचे प्रेमसंबंध तोडले. त्यामुळे संतापलेल्या गौरव याने स्वत:च याबाबत एमपीएसीला माहिती दिली.


परीक्षेपूर्वीच पेपर फुूटल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या वतीने या प्रकरणात महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) अधिनियम,2024 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम; तसेच भारतीय न्या संहितेच्या वेगवेगळ्या कलमान्वये कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोबाइल फोन, त्यावरून साधलेला संवाद, पैशांचे व्यवहार, तसेच इतर तांत्रिक पुरावे आणि संशयितांच्या केलेल्या चौकशीमध्ये एमपीएससीच्या अधिकार्‍यांचा सहभाग आढळला. काही दिवसांपूर्वी शेतकरी नेते रवीकांत तुपकार यांनी इन्स्टाग्रामवरून यासंबंधी माहिती शेअर करताना आरोपी गौरव आणि त्याच्या प्रेयसीचे स्क्रीनशॉट शेअर केले होते.


पोलिसांनी ‘ एमपीएससी’ चे सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, अवर सचिव अभिजित लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांना अटक केली. प्रवीण दिलीप पाटील (संचालक कॉटील्य अकादमी, नंदुरबार), अमृत पाटील आणि लोकेश उर्फ गौरव राजेंद्र पाटील यांचाही या गुन्ह्यात सहभाग आढळल्याने त्यांनाही पकडण्यात आले. या सर्व आरोपींना बुधवारी सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Comments


bottom of page