आंतरवली (सराटी) येथील लाठीचार्जमागे कोणाचा हात?; जरांगे पाटीलांचा रोख कोणाकडे
- Navnath Yewale
- Aug 6
- 2 min read

राज्यातील मराठा समाजास आरक्षण मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 सप्टेंबर 2024 पासून आंतरवली सराटी येथे उपोषण सुरू होते. मात्र, 30 सप्टेंबर रोजी आंतरवली सराटी येथील पोलिस प्रशासनाकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये पोलिस कर्मचार्यांसह शेकडो आंदोलक जखमी झाले.त्यातच आता जरांगे पाटील यांनी पुन्हा ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. त्या पार्श्वभूमिवर गावबैठकांचा धडका सुरू असतानाच तत्कालीन लाठीचार्ज मागे दवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचे म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.
मराठ आंदोलक जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’ ची हाक दिली आहे. आता माघार नाही म्हणत जरांगे पाटील राज्यभरात दौरे करत आहेत. मराठा आरक्षण मागणीसाठी 29 सप्टेंबर 2024 पासून अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले. तत्कालीन शिंदे सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमिवर आंतरवली सराटी येथील आंदोलन समजूत काढून मिटवण्याचा प्रशासनाकडून अतोनात प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, मागण्यांवर ठाम आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलनातून माघार न घेण्याचा पावित्रा घेतला. त्यातच आंदोलक जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली होती.
प्रकृतीच्या तपासणी नंतर दुसर्या दिवशी पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करत आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे पाटील यांच्यावर पोलिस प्रशासनाचा कसलाच प्रभाव पडला नाही. त्यामुळे आंदोलनस्थळी बंदोबस्त वाढवण्यात आला. जरांगे पाटील यांच्या समवेत आंतरवाली सराटी येथील शेकडो ग्रामस्थ आंदोलनस्थळी उपस्थित होते. पोलिस प्रशासनाकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला यामध्ये शेकडो आंदोलक जखमी झाले. दरम्यान, आंदोलनकांच्या प्रतिकारामध्ये पोलिस कर्मचारी जखमी झाले ज्यामध्ये महिला कर्मचारयांचाही समावेश होता. दरम्यान, पोलिसांकडून प्रथम लाठीचार्जचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला.
या प्रकरणामुळे राज्याचं राजकारण पूर्ण ढवळून निघाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: आंदोलनस्थळी येवून आंदोलनकांशी चर्चा केली. विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. त्यातच तत्कालीन आख्खे मंत्रिमंडळ आंतरवली सराटी येथे येवून गेले. सरकार मागण्या मान्य करत नसल्याचा आरोप करत आंदोलन जरांगे पाटील यांनी 26 जानेवारी 2024 रोजी मुंबईमध्ये पायी मोर्चा काढला. मात्र, वाशी मुक्कामी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरे चा अध्यादेश काढत आंदोलकांना आंमलबजावणीचे अश्वासन दिले. शिवाय जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा- कुणबी, कुणबी-मराठा एकच असल्याचे महसूली पुरावे शोधण्यासाठी जस्टीस संदीप शिंदे यांची समिती गठीत केली.
त्यानुसार राज्यभरात 54 लाख नोंदी शोधून लाखो लाभार्थींना ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात आली. राज्यभरातील मराठा समाजास सरसकट ओबीसी आरक्षणाच्या लाभासाठी सगेसोयरे अध्यादेशाची आंमलबजावणी करण्यात यावी, मराठा-कुणबी, कुणबी- मराठा एकच असल्याच्या पुराव्यानुसार समाजास सरसकट ओबीसी आरक्षण लागून करून प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आंदोलक जरांगे पाटीलयांनी पुन्हा एकदा 29 ऑगस्ट रोजी चलो मुंबईची हाक दिली आहे. राज्यभरात आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात येत असून गावबैठकांचा धडाका सुरू आहे. दूसरीकडे आंदोलक जरांगे पाटील यांचे जिल्हे दौरे सुरू आहेत.
त्या पार्श्वभूमिवर पुन्हा आता सरकारडून लाठीचार्ज सारखा प्रकार होवू शकतो का? माध्यम प्रतिनिधींच्या या प्रश्नावर जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मराठ्यांना आता आडवयचा सरकारने प्रयत्नही करू नये, रस्ते आडवले तर डोंगरातून मराठे वाट काढत मुंबई गाठतील असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. आंतरवली सराटी मध्ये झालेला लाठीचार्ज हे तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान, आता सरकारने मराठ्यांच्या नादाला लागू नये, तसा प्रयत्नही करू नये अन्यथा फडणवीस स्वत: सह मोदी सरकारच्याही वाटोळ्याला कारणीभूत ठरतील असा दावाही जरांगे पाटील यांनी धाराशीव बैठकीस मार्गदर्शन करताना केला.



Comments