top of page

आंतरवाली सराटी आंदोलन प्रकरणातील गुन्हे मागे घेणार?

ree

अंतरवाली सराटीमध्ये दोन वर्षापूर्वी मराठा आंदोलनाच्या वेळी झालेल्या दंग्यामध्ये 200 पेक्षा अधिक मराठा आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्ह मागे घेतले जावेत यावर मंगळवारी मराठा उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली.


मात्र हे गुन्हे अत्यंत गंभीर असल्यानं ते मागे घेण्यात अडचणी असल्याचे गृह विभागानं यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवालात नमूद केलं असल्याचं समजतं. हे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्रभ देवेंद्र फडणवीस यांच्याशी उपसमिती चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपसमिती आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. चर्चेला तयार आहे, पण ही चर्चा बंदी खोलीत होणार नाही. सर्वांसमोरच चर्चा होईल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.


मनोज जरांगे पाटील आज सकाळी दहा वाजता मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत शेकडो गाड्या आणि हजारो मराठा बांधव आहेत.

Comments


bottom of page