top of page

आकोल्यात आदिवासी दिनाच्या मिरवणूकीला हिंसक वळण, एपीआयवर प्राणघातक हल्ला; जवळच्या घरात शिरुन जीव वाचवला

आकोला : जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील महान येथे काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूकीला हिंसक वळण लागून पिंजर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अभिषेक नवघरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली. मिरवणूकीदरम्यान सुरू झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकार्‍यालाच जमावाने मारहाण करत त्यांच्या शासकीय गणवेश फाडल्याचा आरोप आहे या घटनेनंतर महान परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी वस्तापूर झोडगा फाट्यावरून आदिवासी बांधवांची मिरवणूक महानच्या दिशेने निघाली होती. या मिरवणुकीत काही व्यक्तींमध्ये आपसात जोरदार वाद सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हाय्यक पोलिस निरिक्षक अभिषेक नवघरे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले.

मात्र, संतप्त जमावाने पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार देत अधिकार्‍यावरच हल्ला चढवला. या मारहाणीत नवघरे यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. जमाव मागे लागल्याने त्यांनी जवळच असलेल्या एका घरात शिरून आतून कडी लावून घेत स्वत:चा जीव वाचवला.


दरम्यान, जागतिक आदिवासी दिनानिमित्त मिरवणूकीत जवळपास 500 लोक होते. तिथे काही कारणावरून वाद सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळातच आम्ही तो वाद सोडविण्यासाठी 10 पोलिस कर्मचारी तसेच अधिकारी पाठवले. परंतु लोक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही लोकांनी पोलिस अधिकारी अभिषेक नवघरे यांच्यावर हल्ला केला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर केले आहेत. प्रकरणातील काही आरोपींना अटक केली आहे. पुढील कारवाई होईल अशी माहिती अकोल्याचे पोलिस अधिक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी दिली.

Comments


bottom of page