top of page

धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणी उद्या अहिल्यानगर बंदची हाक

मृतदेह पोलिस अधिक्षक कार्यालयात ठेवणार; मुख्य आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप आक्रमक

अहिल्यानगर: अहिल्यानगरमध्ये महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणी सोमवारी बंदची हाक देण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्य आरेापीच्या अटकेपर्यंत मृतदेह पोलिस अधीक्षक कार्यालयातून हलू देणार नाही, अशी भूमिका संग्राम जगताप यांनी घेतली आहे.


शहरातील मुकुंदनगर येथील मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मापालिका कंत्राटी कर्मचारी धरीर परदेशी यांच्या मृत्यूप्रकरणी अहिल्यानगर शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या निशेधार्थ उद्या अहिल्यानगर बंदची हाक देण्यात आली आहे. मुख्य आरोपीला अटक होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची आक्रमक भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी घेतली आहे.


धीरज परदेशी यांचे मृतदेह आज घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी रवान करण्यात आले. मात्र, मुख्य आरोपीला अटक झाल्याशिवाय अंत्यविधी होऊ देणार नाही, असा इशार आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे. मुख्य आरेापीला अटक झाली नाही तर उद्या मृतदेह थेट पोलिस अधिक्षक कार्यालयात आणून तिथेच ठेवण्याची भूमिकाही जगताप यांनी जाहीर केली आहे.


धीरज परदेशी यांच्यावर झालेली मारहाण ही अचानक घडलेली घटना नसून पूर्वनियोजित कट असण्याचा संशय व्यक्त होत आहे. या हल्ल्यामागे आणखी काही प्रमुख आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून, पोलिसांनी या दिशेनेही तपास करावा अशी मागणी होत आहे.


दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हैदराबादपर्यंत तपासाची चक्रे फिरवत आरोपींना ताब्यात घेतल. मात्र या कारवाईनंतरही मुख्य आरोपी अद्याप हाती न लागल्याने संताप कायम आहे. धीरज परदेशी हे कर्तव्य बाजवत असताना त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे महापालिका कर्मचारी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

Comments


bottom of page