आमदार सत्यजित तांबे सह 300 जणांवर गुन्हे दाखल रास्ता रोको आंदोलन भोवलं; नाशिकच्या वावी पोलिसांत गुन्हा
- Navnath Yewale
- 9 hours ago
- 1 min read

नाशिक : आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात गोंदे शिवारात मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आलं. जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी आमदार तांबे यांच्यासह व इतर 300 आंदोलकांवर वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर विधान परिषदेचे आमदार तांबे यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
नाशिक- पुणे रेल्वे मार्ग जुन्याच आराखड्यानुसार नाशिक-सिन्नर- संगमनेर- चाकण मार्गे व्हावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली. वावी पोलिस ठाण्यात आमदार तांबे यांच्यासह 300 ते 350 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्या मार्गाने रेल्वे मार्ग ठरलाय त्यात बदल करू नका, या मागणीसाठी तांबे यांनी आदोलन पुकारले होते. 22 फेब्रूवारी 2026 ला रेल्वेसाठी प्रश्न मांडला, त्यानुसार समिती नेमली आहेश. आम्ही दोन मागण्या केल्या आहेत. काकोडकर समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देता कामा नये. काकोडकर यांना शास्त्रज्ञ म्हणून नेमले आहे, दोन विभागीय आयुक्त दिले आहेत, रेल्वे बोडाृचा अधिकारी सुद्धा नेमला आहे. जनभावनेचा विचार केला जावा, फक्त तांत्रिक कारणांचा विचार करू नये आणि ठरल्याप्रमाणे हा मार्ग जुन्याच आराखड्याने झाला पाहिजे असं आमदार तांबे म्हणाले.



Comments