आज जर दादा आले, तर मी त्यांना घट्ट मिठ्ठी मारेल..दादा परत येणार नाहीत - आमदार रोहित पवार
- Navnath Yewale
- Feb 10
- 2 min read

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांत बारामती विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवारांचे निधन झाले नसून विमानाचा अपघात झाल्यानंतर 6 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं. मग,विमान दुर्घटनेतून पाच जणांचेच मृतदेह कसे बाहेर आले. त्यात हे अजित दाद नसून दुसरीच बॉडी आणलीय, असे वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी केलं होतं. तर सोशल मिडियावरही अनेक प्रश्नद आणि व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवार जिवंत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र,दुर्दैवाने अजित पवार जिवंत नाहीत, दादा परत येणार नाहीत असे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत पुराव्यांसह स्पष्ट केले.
रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच, आपण अजित पवारांच्या निधनाबद्दल आणि विमान दुर्घटनेसंदर्भाने लवरकच पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. अजित दादांचा अपघात होता की घात अस प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडलेला आहे. लोकांनी भावनिक होऊन व्हिडिओ टाकले की दादा पर येतील. कारण, विमानात 6 जण होते आणि 5 जणांचे मृतदेह बाहेर आले. त्यामुूळे, ती बॉडी दादांची नव्हती. दादा आज येतील, उद्या येतील असं अनेकांना वाटतंय. खरंच दादा परत आले तर मी दादांना घट्ट मिठी मारेन. दादांचा अपघात स्वप्न असल्याचा भास मला होत होता.
पण, अपघाताच्या घटनास्थळी जेव्हा मी पोहोचलो, तेव्हा तिथे सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सगळे निशब्द झाले होते. कुणाला काही बोलता येत नव्हतं. अपघात झाल्यानंतर दादाचा स्वेटर मी पाहिला, घड्याळ पाहिलं, अजित दादा नेहमी आपलं घड्याळ 15 मिनिटे पुढे ठेवत होते, अपघातानंतर अजित पवारांच्या बंद घड्याळात 9 वाजलेले होते, अशी माहिती रोहित पवारांनी दिली. त्यामुळे, मला सर्वांना एवढच सांगायचं आहे की, जी घटना झाली नाही, दादांनी काही झालं नाही असं आपल्या सर्वांना वाटतं. पण, तसे नसून ती घटना घडलीय आहे. आज दादा आपल्यासोबत नसले तरी विचारांनी ते आपल्यासोबत आहेत, रोहित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी , त्यांनी व्हिडिओ प्रेझेंटेशनही केलं.
सकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी अजित दादांची क्रू तयारी झाली, 7 वाजून 3 मिनिटांनी बारामती येथील हवामान परिस्थितीचा आढावा घेतला गेला. सकाळी 8.43 ते 8.45 दरम्यान विमान दुर्घटना घडली असेल , असे रोहित पवार यांनी सांगितले. कारण, 9 वाजता अजित पवार गंभीर जखमी आहेत अशी बातमी समोर आली होती. तर, 9:45 वाजता अजित पवार गेल्याची बातमी समोर आली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. तसेच हे विमान 2 दिवस आधी सुरतला जाऊन आले होते. याचे मालक म्हणाले, हवामानामुळे अपघात झाला असावा अशीही महिती रोहित पवारांनी दिली. ग्रामपंचायत सीसीटीव्ही समोर आलं आणि त्यातून हवामान परिस्थिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर लक्षात येतं की, कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरत असून यांत्रिक बिघाड झाला असावा हे स्पष्ट होतं असेल. मॅकेनिकल फेल्यअर झाले असेल का? विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आले होते का? असे प्रश्न उपस्थित होतं आहेत, असेही रोहित पवार म्हणाले.
या अपघाताविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले, अजितदादांचा मुंबई ते बारामती प्रवास हा 210 किलोमिटर होता. त्यासाठी विमानाला 27 मिनिटं लागणार होते. संबंधित विमान हे व्हिएसआर नावाच्या कंपनीचं होतं. ते अमेरिकेत विमान तयार झालं होतं या विमानात अजितदादा हे लेप्ट साईटला बसले असावेत, असां अंदाजही रोहित पवार यसांनी यावेळी व्यक्त केला. तर दुसर्या सेक्शनमध्ये बॅगा होत्या. तसेच पाठीमागे पेट्रोलच्या टाक्या आहेत. या कंपनीची लेअरजेटबाबत त्यांची देशात मोनोपॉली आहे. सार्वधिक लेअरजेटची विमाने त्यांच्याकडे असल्याचवा दावाही पवार यांनी अजितदादांच्या अपघाताविषयी बोलताना केला.



Comments