आझाद मैदानावरील धनगर आराक्षण आंदोलन तात्पुरते स्थगित सरकारचं चर्चेचं अश्वासन; आंदोलक दिपक बोराडेंची घोषणा
- Navnath Yewale
- Jan 21
- 2 min read

मुंबई : राज्यातील धनगर समाजास एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक दिपक बोराडे यांनी हजारो समाज बांधवांसमवेत बुधवारी (दि.21) आझाद मैदानवर आंदोलन सुरू केले होते. सरकारने मागण्यांची दखल घेवून आंदोलकांशी चर्चेचे अश्वासन दिल्याने आंदोलक दिपक बोराडे यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा केली.
धनगर आरक्षण आंदोलक दिपक बोराडे यांनी राज्यातील धनगर समाजास एसटी(अनुसूचित जमाती) प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार पुकारला आहे. राज्यातील लाखो समाजबांधवांसमवेत मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलनास परवानगीसाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. आझाद मैदान पोलिसांनी त्यांना 21 जानेवारी परवानगी दिली. त्यानुसार दिपक बोराडे राज्यातील पोलिस यंत्रणेला चकवा देत मंगळवारी मुंबईत पोहोचले होते.
दरम्यान, मुंबई येथील आझाद मैदानवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने दि.17 पासूनच जिल्ह्यात संचारबंदी लागू केली होती. शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते शिवाय पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास प्रतिबंध लागू करण्यत आला होता. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात समाजातून संताप व्यक्त करण्यात आला.
मागणीवर ठाम आंदोलक दिपक बोराडे यांनी राज्यातील धनगर समाज बांधवांना आहवान करत मुंबईकडे निघण्याची हाक दिली होती. मात्र, दिपक बोराडे यांना मुंबईकडे निघण्यापूर्वीच आंदोलकांना पोलिसांनी ठिकठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला. दिपक बोराडे यांनी प्रथम माजलगांव येथे एकत्र येण्याचे आंदोलकांना आवाहन केले होते. पण प्रशासनाचा वाढता दबाव लक्षात घेता दिपक बोराडे यांनी पोलिसांना चकवा देत मंगळवारी दि.20 थेट मुंबई गाठली.
आंदोलक दिपक बोराडे याना आझाद मैदानावर येण्यापूर्वी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याचेही वृत्त आहे. पोलिस प्रशासनाच्या परवानगीनुसार आज बुधवारी (दि.21) दिपक बोराडे आझाद मैदानात हजर झाले. सरकारने मागणीचा गांभीर्याने विचार करून राज्यातील धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले. दरम्यान, कालपासून राज्याभरातून हजारो आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. शिवाय आझाद मैदानावर पूर्वीपासूनच हजारो आंदोलकांचा सहभाग होता. सायंकाळी आंदोलनस्थळी सरकारकडून मुंबईचे पोलिस उपायुक्तांनी लेखी अश्वासन दिले. त्यानुसार सरकार धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी आंदोलकांशी चर्चेस तयार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आंदोलक दिपक बोराडे यांनी आंदोलनस्थील अश्वासनाची प्रत वाचून दाखवली.
चर्चेतून मार्ग निघत असेल तर काही दिवस वाट पाहून पुन्हा नव्या जोमाने आंदोलन उभारण्याचे घोषणा करत आझाद मैदानावरील सुरू असलेले उपोषण तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा केली.
मराठा बांधवांचे मानले आभार : आंदोलक दिपक बोराडे यांनी माजलगाव (बीड) ते मुंबई प्रवासाचा किस्सा सांगत मराठा बांधवांचे आभार मानले. पुढे बोलताना दिपक बोराडे म्हणाले की, राज्यात जातीवादाचे विष पेरून स्वत:ची पोळी भाजणार्यांनी मला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. समाजाने आता जातीवादातून बाहेर पडायचं आहे.माजलगाव मधून पोलिसांच्या तावडीतून एका मराठा सरपंचाने मला काढलं.
शिवाय माजलगाव ते मुंबईपर्यंत माराठा समाजाच्या व्यक्तीनेच त्याच्या स्वत:च्या गाडीतून आणलं, विशेष म्हणजे तो स्वत: गाडी चालवत होता. जरांगे पाटलांनी सुरुवातीपासूनच आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आंदोलनाला स्पॉन्सर म्हणून डिवचलं जात आहे. आंदोलन सुरू केलं तर राजेश टोपे यांच नाव आंदोलन स्थगित केलं की मुख्यमंत्री फडणवीस यांना मॅनेज झाला असे आरोप केले जातात. पण मी सांगू इच्छितो की, दिपक बोराडे याचं कॅरेक्टर निर्मळ पाण्या प्रमाणे आहे. जातिवादाच्या दलालांना उत्तर द्यायचं शिका, यापूढे कोणी दिपक बोराडेच्या आंदोलनावर बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा देत समाज बांधवांनी मुंबईकडे येवू नये असे अवाहनही त्यांनी यावेळी केले.



Comments