आतिवृष्टी: शेतात तळे, उभेपिक खरडून गेल; घरात पाणी शिरले, संसारपयोगी साहित्यांसह अन्न धान्य वाहून गेले
- Navnath Yewale
- Sep 23
- 2 min read
बीडमध्ये आमदार तर धाराशिवमध्ये खासदाराचा बचावकार्यात सहभाग

आठवडाभरापासून मराठवाड्यात मुसळधार-ढगफुटीसद़ृष्य पावसाने थैमान घातले आहे. नद्यांना महापूर आल्याने शेतशिवारांना तळ्यांचे स्वरूप आले आहे. नद्यांच्या महापुराचा प्रवाह काठच्या परिसरातून झाल्याने पीकांसह शेती खरडून गेली आहे. महापुरामुळे शेती खरडून गेली, ज्या शेतात तळे साचले त्या जमिनीची सुपीकता (कसदार माती) वाहून गेली आहे.

शहरं गावखेड्यांसह रानवस्त्यावरील घरात पुराचे पाणी शिरल्याने कित्तेक संसार उघड्यावर आले आहेत. डोळ्यादेखत उभ्या पीकासह जमिन खरडून गेली, बहूतांश शेतजमिनीमधील पीके पाण्यातच आहेत. घरात पाणी शिरल्याने जिव वाचवण्याच्या अकंताने भरले घर सोडावे लागले. संसारपयोगी साहित्यांसह अन्न धान्य वाहून गेल्याने डोंगराएवढे संकट उराशी घेवून जगण्यासाठी संघर्ष करणार्या संकटग्रांस्तांची विविध लोकप्रतिनिधींनी भेट घेवून मदतकार्यात सहभाग घेतला.

प्रशासनाकडूनही पंचनाम्याची लिखापढी सुरु झाली असली तरी अद्याप भरिव मदत पोहोचली नाही. परंतु सामाजिकसंस्था, लोकप्रतिनिधींकडून काही ठिकाणी मदतीचा ओघ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात महापूरामध्ये आडकलेल्या नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वत: एनडीआरएफ जवानांसोबत बचावकार्यात सहभाग घेवून एकाच कुटुंबातील महिला, चिमुकल्यांसह दोन वृद्ध अशा चार नागरिकांना वाचवले.

दरम्यान,पुराच्या पाण्याने वेढा दिल्यामुळे हे कुटुंब एक रात्र, एक दिवस घराच्या स्लॅबवर अन्न-पाण्याविना जीव मुठीत घेवून मदतीच्या प्रतिक्षेत होते. अखेर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तातडीने प्रशासन यंत्रणेला हाताशी धरून तब्बल 24 तासांनंतर या कुटुंबाचा जीव वाचवण्यात यश आले.

बीडच्य आष्टी, पाटोदा, शिरुर कासार मध्ये पुरामुळे हजारो हेक्टर शेती पीकांसह खरडून गेली. आमदार सुरेश धस, देविदास धस,श्याम धस, जसदत्त धस, सागर धस पूर्ण धस परिवार आष्टी, पाटोदा, शिरुर कासार मध्ये तळ ठोकून होता. बीड विधानसभा मतदार संघात आमदार संदीप क्षिरसागर यांनी शिरापूर गात येथे पुराच्या पाण्यात आडकलेल्या महिला- चिमुकल्या इतर दोन नागरिकांना एनडीआरएफ जवनांसोबत बचावकार्यात सहभागी होवून रेस्क्यू केले.

माजलगाव तालुक्यात आमदार प्रकाश सोळंके यांनी तातडीने बचावकार्यासाठी सूत्रे हलवली आणि पुराच्या पाण्यात आडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू केले. गेवराई विधानसभा मतदारसंघात धारवंटा, उक्कडपिंप्री गावाना सिंदफणा नदीच्या पुराचा वेढा बसल्याने येथील बचावकार्यात आमदार पंडित परिवातील जयसिंह पंडित यांनी सहभाग घेतला तर आमदार विजयसिंह पंडित यांनी गोदाकाठच्या गावात बचावकार्यात सहभाग घेतला.

आज आमदार सुरेश धस यांनी आष्टी, पाटोदा तालुक्यासह शिरुर कासार तालुक्यातील ब्रम्हणाथ येळंब, शिरुर कासार, चाहूरवाडी, सवसवाडी येथील अतिवृष्टी बाधीत क्षेत्रांची पाहाणी करत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आवश्यक मतदतीचे अश्वासनही आमदार धस यांनी दिले. शहरातील सिंदफणा काठावरील व्यवसायीकांच्या नुकसानीबाबत प्रशासनाला सूचनाही त्यांनी दिल्या.



Comments