आदिवासी भागात आरोग्य विभागच सलाईनवर
- Navnath Yewale
- Sep 5
- 1 min read

जव्हार : १९ ऑगस्ट पासून आरोग्य विभागात एन.आर, एच. एम. अंतर्गत काम करणारे सर्व कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात आरोग्याचे तीन तेरा वाजलेआहेत. दि ०३ सप्टेंबर २०२५ रोजी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बळवंत गावीत यांनी जव्हार पतंग शाह कुटीर रुग्णालयास भेट दिली असता असे लक्षात आले की मागील दहा-बारा दिवसापासून बारा बारा तास कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवावी लागत आहे. अतिशय अपुऱ्या मनुष्यबळावर आदिवासी भागातील सेवा पुरविणे फार कठीण होऊन बसले आहे.
पुन्हा बालमृत होतात की काय अशी शंका घ्यायला फार मोठा वाव आहे. शासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेऊन त्यांना न्याय द्यावा. जोपर्यंत त्या संपावर तोडगा निघत नाही तोपर्यंत शासनाने खाजगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना किंवा त्या क्षेत्रातील तज्ञांची तात्पुरत्या स्वरूपाची मदत घेऊन आदिवासी भागात वैद्यकीय सेवा दर्जेदार पुरवावी अशी मागणी पालघर जिल्हाकाँग्रेस कडून करण्यात येत आहे. आदिवासींचा बळी गेल्यास शासनास जबाबदार का धरू नये असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तरी लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करावी अशा प्रकारची विनंती काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्यामुळे आरोग्य विभागामध्ये रुग्णांना मोठ्या प्रमाणात नाक त्रास सहन करावा लागतो. दहा-बारा दिवसापासून बारा बारा तास कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवी लागत आहे.सरकारने लवकरात लवकर रिक्त नवीन पद भरती करण्यात यावी.
काँग्रेस नेते पाटील व बळवंत गावित.



Comments