top of page

स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचा गंजाड येथे शुभारंभ

ree

डहाणू : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) करण्यात आला. उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऋग्वेद दुधाट यांच्या हस्ते झाले.


या अभियानाचा उद्देश महिला व बाल आरोग्य सुधारणे, पोषणाबाबत जनजागृती करणे तसेच समुदायाच्या सर्वांगीण कल्याणाला चालना देणे हा आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबवले जाणार असून यात गरोदर माता, नवजात बालके, किशोरवयीन मुलींच्या आरोग्य तपासण्या, उच्च रक्तदाब, मधुमेह, अ‍ॅनिमिया, टीबी आणि सिकल सेल रोग आदींची तपासणी, लसीकरण आणि पोषण सल्ला यावर विशेष भर दिला जाणार आहे.उद्घाटन प्रसंगी गंजाड सरपंच मा. कौशल कामडी यांनी ग्रामस्थांना शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तर सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे आणि माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सूरभी यांनी PHC ची पाहणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी, आशा कार्यकर्त्या, ANM, GNM, MPW आणि आरोग्य कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गंजाड व परिसरात विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून महिलांना व कुटुंबांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Comments


bottom of page