सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतिने साकुर येथे आरोग्य शिबीर
- Navnath Yewale
- Sep 5
- 1 min read

जव्हार : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, साकुर यांच्या मार्फत सार्वजनिक गणेश मंडळ साकुर येथे 'श्री गणेशा आरोग्याचा' अभियानंतर्गत समुदाय आरोग्य शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य विभागाच्या वतीने या उपक्रमाद्वारे सर्व ग्रामस्थांना मोफत आरोग्य तपासण्या होऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत हा उद्देश साधला गेला. शिबिरात मोठ्या
संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . संतोष चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.साळुंखे, यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यासाठी अतिरिक्त जिल्हा जिल्हा अधिकारी, जव्हार डॉ. किरण पाटील, जव्हार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रितेश कुमार पटेल, यांचे सहकार्य लाभले, साकुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सदानंद काशिदे, प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्व टीम या सर्वांचे सहकार्याने मेहनत घेऊन त्या शिबिरामध्ये १७६ रुग्णाची पूर्ण तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यासाठी साकुर ग्रामपंचायत उपसरपंच . वळवी यांचे सहकार्य मोलाचे महत्त्वाचे ठरले. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साकुर चे सर्व GNM, ANM MPW, BF आशावर्कर्स ताई व सर्व कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेतली.
आतापर्यंत प्रा. आ. के. साकुर चे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ सदानंद काशिदे यांच्या कडून नेहमीच त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी ' कर्करोग तपासणी शिबीर, क्षयरोग तपासणी शिबीर, X- ray शिबीर, नेत्ररोग निदान शिबीर, कुष्ठारोग तपासणी शिबीर, सिकल सेल तपासणी शिबीर,मानसिक रुग्ण तपासणी शिबीर, गरोदर स्त्रिया व कुपोषित बालक तपासणी शिबीर असे विविध आरोग्य शिबीर आयोजित करुन नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.



Comments