top of page

आदिवासी वसतीगृहाचा करार फाडला; अभिजीत दिकपे आक्रमक एमपीएससी अध्यक्ष फडणवीस यांचे मित्र म्हणून राजीनामा होत नाही का?

5 hours ago
2 min read

नागपूर: अदिवासी विकास विभागाने लक्ष्मण मानकर ट्रस्टसोबत केलेला 490 आदिवासी वसतीगृहांच्या व्यवस्थापनाचा करार रद्द करावा अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली. कराराची प्रत फाडून त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, नागपूर येथे विदर्भातील विविध जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांशी दिपके यांनी बुधवारी (दि.16) संवाद साधला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढताना मोजक्यवा आणि ठोस मागण्या निश्चित करून त्यासाठी सातत्याने संघर्ष करण्याचा सल्ला त्यांनी दिला.“ एमपीएससी विद्यार्थ्यांनी 12 मागण्यांसाठी आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यापैकी 11 मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन संपले. मात्र विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी पूर्ण झाली नाही” असा दावा करत दिपके यांनी आंदोनलाच्या रणनितीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.


आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यापक जनसमर्थन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत घडणार्‍या घटनांची माहिती समाजातील इतर घटकांपर्यंत पोहचवावी, असे अवाहन दिपके यांनी केले. यासाठी घटनांचे व्हिडिओ तयारक रून ते मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्याची गरज असल्याचे दिपके म्हणाले सीजेपी च्या माध्यमातून मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचता येते. आदिवासी विद्यार्थी- विद्यार्थीनींच्या प्रश्नांची जाणीव समाजातील इरत घटकांना झाली, तर सरकारवरही प्रश्न सोडविण्यासाठी दबाव निर्माण होईल, असंही दिपके यावेळी म्हणाले.


नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीविरोधात जंतर- मंतर येथे झालेल्या आंदोलनाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. पेपरफुटीच्या पार्श्वभूमिवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा आक्रोश देशभरातील पालकांना आपला वाटला. त्यामुळे आंदोलनाला व्यापक जनसमर्थन मिळाले आणि केंद्रातील शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. असा दावा त्यांनी केला. आदिवासींच्या प्रश्नांसाठी लढताना केवळ आदिवासी समाजानेच आवाज उठविण्याऐवजी हे प्रश्न व्यापक समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यातूनच सरकारला प्रश्नांची दखल घेण्यास भाग पाडता येईल असंही अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले.


आदिवासी समाजाचा देशाच्या विकासात बरोबरीचा वाटा असला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन देशाचे नेतृत्व करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. जंगलावर आधारित पारंपरिक उपजीविकेच्या संधी आता मर्यादित होत आहेत. त्यामुळे केवळ गावखेड्यांपुरते मर्यादित न राहता आदिवासी विद्यार्थ्यांनी शहरांकडे येऊन उच्चशिक्षण घ्यावे आणि विविध क्षेत्रांत नेतृत्वाची भूमिका स्वीकारावी असे अहवान त्यांनी यावेळी केले.


एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी अभिजीत दिपके यांनी केली. भिमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र आहेत, म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही का? असा प्रश्न8 अभिजित दिकपे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर विचारला. इतकंच नाही काय तर भिमनवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे, या मागणीवर जोरही त्यांनी दिला. तसेच भिमनवार यांच्या कथित घोटाळ्यांचा दोन मिनिटांचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी.

Comments


bottom of page