जरांगे पाटीलांचा उद्या दुपारी मुंबईला निघण्याच इशारा

बीड: मराठा आंदोलक जरांगे पाटील उपोषण सुरू असतानाच आहे त्या स्थितीमध्ये मंगळवारी (दि.15) मुंबईकडे रवाना झाले आहेत. नियोजीत मुक्काम ठिकाणांहून ते दि. 19 सप्टेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल होणार आहेत. मात्र, प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर पाटोदा, जि.बीड (मुक्काम ठिकाण)उपचार करण्यात आले. उपचारानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझी प्रकृती ठिक नाही त्यामुळे मला इथून मार्गस्थ होता आलं नाही. पण मी मागे हटणार नाही, उद्या दुपारी 1:00 वाजेपर्यंत मी मुंबईकडे निघणार असल्याचं जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याने पाटोदा येथे बुधवारी दि.16 त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपोषण सुरू असताना जरांगे पाटील यांनी मंगळवारी (दि.15) अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे मार्गक्रम केला. नियोजीत पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी पाटोदा , जि. बीड येथे मध्यरात्री 1:45 वाजता पोहोचताच त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालवली. समाजबांधवांच्या अग्रहाला न जूमानता त्यांनी सुरुवातील उपचारास नकार दिला. डॉक्टरांच्या टीमने त्यांनी आरोग्य तपासणी केली असता त्यांना आयसीयूमध्ये उपचाराची गरज असल्याचे सांगितले.
मात्र, जरांगे पाटील उपचार घेत नसल्याने सकाळी नारायणगडाचे महंत शिवाजी बाबा महाज यांच्या आग्रहास्तव जरांगे पाटील यांनी उपचार घेतले. उपचारानंतर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून मी मुंबईला जाणारच!, मागे हटणार नाही. समाजबांधवांना मुंबईला येण्याची तारीख सांगणार होतो, मात्र सरकारने ड्राप्ट दिला आहे. त्यामुळे मी आता सांगू इच्छित नाही. मात्र मी उपचारानंतर उद्या दि.17 सप्टेंबर रोजी दुपारी1: 00 वाजेच्या सुमारास मुंबईला निघणार असल्याचा इशारा दिला.
इकडे जरांगे पाटील यांची प्रकृती खालवलेली सताना ते मुंबईत आंदोलनावर
ठाम आहेत, तर तिकडे सरकारस्तरावर जोरदार हालचालिंना वेगे आला आहे. जरांगे पाटील यांनी खुल्या सार्वजनिक चर्चेची दारे खुली ठेवल्याने उद्यापर्यंत सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Comments