top of page

पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच,जरांगे पाटलांनी डाव टाकला

3 hours ago
2 min read

अंतरवली: मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनेाज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाच्या रणनितीत बदल करत मोठा डाव टाकला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता संपूर्ण मराठाव आंदोलकांची फौज सोबत घेऊन न जाता एकट्यानेच मुंबईला जाण्याची घोषणा केली आहे. गणेशोत्सवाच्यसा काळात लाखो मराठा आंदोलक मुंबईत आल्स कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण पोलिसांनी दिले होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मी एकटाच मुंबईला येतो अशी घोषणा केली आहे.


आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनासाठी आज दुसर्‍यांदा परवानगी नाकारली आहे. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पोलिसांनी जरांगे पाटील यांना आझाद मैदानामध्ये आंदोलनास परवानगी नाकारल्याने जरांगे पाटील यांनी आंदोलनाचं स्वरुप आणि दिशा बदलत सरकारला मोठा इशारा दिला आहे. माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली. जरांगे पाटील आता त्यांच्या चार ते पाच सहकार्‍यांसह मुंबईला रवाना होतील. “आता पोलिस आणि देवेंद्र फडणवीस मला मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाहीत. आता मला कोणी अडवले तर लाखो मराठे विनापरवानगी मुंबईत घुसतील” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला ते सोमवारी (दि.14) अंतरवली सराटी येथे आंदोलनस्थळावरून मांध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.


जरांगे पाटील म्हणाले की, पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आता आपल्याला रणनितीमध्ये बदल करावे लागतील. फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकायचा आपण. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली ना, मग 15 तारखेला मी एकटा मुंबईला निघतो. आता मला एकट्याला देवेंद्र फडणवीस परवानगी देणार की नाही? मराठे मुंबईत गेल्यावर अडचणी निर्माण होणार,मग मी एकटा गेल्यावर परवानगी देणार नाही का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. मी आधी एकटा खिंड लढतो, मराठ्यांच्या वाटतील काटे दूर करू द्यात. म्हणजे तुम्हाला अडचण होणार नाही.


रस्त्यातील काटे संपतील मग तुम्हाला सांगतो कधी यायचं मुंबईला, त्यामुळे आता मुंबईच्या मराठा आंदोलनासाठी तयार केलेल्या गाड्या आणि वर्गणी तशीच ठेवा. त्यामधील एक रुपयाही खर्च करू नका. मी आता सलाईन काढली आहे, त्यामुळे पोटात आग व्हायला सुरुवात झाली आहे. पुढील पाच- सहा दिवसांचा माझा प्रवास जीवघेणा आहे. मी मुक्काम करताना कोणाच्याही घरी राहणार नाही, चौकात राहीन. ही शेवटची झुंज होणार आहे. एकाच दिवशी सगळी ताकद वाया नाही घालवायची. आपली राखीव फौज ठेवायची आहे, जसे शिवाजी महाराजांनी केले. माझ्यावर नाराज होऊ नका, मी खिंड लढतो, मला तुमच्या रस्त्यावरचे काटे काढू द्या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले.


दरम्यान, मुंबई पोलिसांनी कालच मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला अनेक कारणे देऊन परवानगी नाकारली होती. मात्र, आता मनोज जरांगे यांनी मी एकटा येतो सांगून नवा डाव टाकला आहे. यावर आता मुंबई पोलिस काय भूमिका घेतात, हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील उद्या दि.15 तारखेला सकाळी अंतरवली सराटीतून मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. त्यानंतर पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर, खोपोलीमार्गे 19 सप्टेंबरला मुंबईत पोहोचणार आहेत. मात्र पोलिस मुंबईच्या वेशीवर अडवून त्यांना आंदोलना पासून परावृत्त करणार का? याकडे संगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments


bottom of page